मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोयाबीन उगवले नाही,त्यामुळे कशीबशी दुबार पेरणीकेली.दुसरीकडे मुलाचे इंजिनिअरिंगचे ऑनलाइन शिक्षण चालू असल्यामुळे मुलाने लॅपटॉपची मागणी केली. पैशाची अडचण असल्यामुळे लॅपटॉप कसा घ्यायचा,या विवंचनेतून कळंब तालुक्यातील बहुला येथील शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. The child asked for a laptop for online learning; Hatbal farmer’s father’s suicide
बहुला येथे महादेव सूर्यभान बिक्कड यांनी ३ बॅग सोयाबीनची पेरणी केली.मात्र २ बॅगमधील सोयाबीन उगवले नाही.दुबार पेरणीला पैसे नसल्यामुळे त्यांनी बाजरी पेरली.महादेव यांचा मोठा मुलगा गणेश हा पुणे येथे कॉम्प्युटर इंजिनिअरचे शिक्षण घेत आहे.
सध्या ऑनलाइन शिक्षण चालू असल्यामुळे गणेशने वडिलांना लॅपटॉप घेण्यासाठी पैशांची मागणी केली. दुबार पेरणी झाली आहे,पैशाची अडचण असल्याचे सांगत महादेव रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घराबाहेर पडले. सोमवारी सकाळी ८ वाजता महादेव यांनी शेतातील झाडाच्या फांदीला केबल वायरने गळफास घेतल्याचे आढळून आले.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज