मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचा भंग करणाऱ्यांवर येथील पोलिसांनी रविवारी व सोमवारी केली. मास्कविना फिरणाऱ्या ११० जणांकडून २२ हजार, दुचाकीवर दोन व्यक्ती बसून फिरणाऱ्या १०५ जणांकडून २१ हजार , दुचाकीवर तिघे बसून फिरणाऱ्या २७ जणांकडून २० हजार ५०० , दुकानात गर्दी केलेल्या तिघांकडून तीन हजार , वाहनातून तीनपेक्षा जास्त जण फिरणाऱ्या चौघांकडून चार हजारांचा दंड वसूल केला. Violation of Barshi rules, action by police
तसेच कंटेनमेंट झोनमध्ये आढळलेल्या पाच जणांवर , कलम ६८ व ६ ९ चे पालन न करणाऱ्या ७३ जणांवर पोलिस कारवाई केली. यासाठी पोलिसांनी चार पथके नेमली आहेत.
रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी काळात बाहेर पडणारे , नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केल्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज