टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत १०२ पथकामार्फत ४१ हजार ७८० कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले. My family is my responsibility ‘campaign
या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील मिळून १ लाख ८५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.यामध्ये २४९ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ७३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.या मोहिमेत गावे, तांडे, वस्त्या, प्रभागातील प्रत्येक घराला भेट देण्यासाठी ८१ गावासाठी १०२ आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.
या अभियानांतर्गत आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे रोज ५० कुटुंबांची आरोग्यविषयक माहिती संकलित करून ती ॲपद्वारे अद्ययावत केली जाते
खोकला, ताप, दमा लागने अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या रुग्णांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भीत केले जात आहे.
तसेच विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनंजय सरोदे यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत एका पथकात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, एक शिक्षक व एक आरोग्य कर्मचारी याचा समावेश आहे.
६ हजार ८४६ रक्तदाब , मधुमेह रुग्णसंख्या
या सर्वेक्षणात आजपर्यंत ६ हजार ८४६ इतके मधुमेह व रक्तदाब सारख्या दुर्दम्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत.
आहारात पालेभाज्या, मासे ,फळे आणि कडधान्यांचा समावेश असावा
पूर्वी शहरात हृदयरोगाचे रुग्ण आढळून येत असत आता ग्रामीण भागातही बदलत्या जीवनशैलीमुळे युवावर्गात हे लक्षण अधिक आहेत युवापिढी वाढता ताण तणाव व्यसने म्हणजे धूम्रपान आणि मद्यपानाच्या आहारी गेली आहे.
यातून रक्तदाब ,मधुमेह हे आजार बळावले त्याचे रुपांतर हृदयरोगात झाल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. ह्रदयरोगापासून मुक्ततेसाठी तरुणाईने पुढाकार घेत व्यायाम करणे जंग फूड आणि तळलेले पदार्थ तसेच धूम्रपानापासून स्वतःला सावध ठेवले पाहिजे.
पालेभाज्या, मासे ,फळे आणि कडधान्यांचा समावेश असलेला सकस आहार सेवन केला पाहिजे यामुळे हृदय रुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी होतो :- डॉ.प्रवीण सारडा
१०२ पथकामार्फत ४१ हजार ७८० कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण
माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत १०२ पथकामार्फत ४१ हजार ७८० कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण केले. या सर्वेक्षणामध्ये या कुटुंबातील मिळून १ लाख ८५ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
यामध्ये २४९ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ७३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर ६ हजार ८४६ रक्तदाब , मधुमेह, किडनी, लिव्हर सारखे दुर्धर आजाराचे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी पथकाला खरी माहिती देऊन सहकार्य करावे:- स्वप्निल रावडे, तहसीलदार मंगळवेढा
My family is my responsibility ‘campaign Survey of 41 thousand 780 families in Mangalvedha taluka completed; Patients with chronic diseases like high blood pressure and diabetes were found
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज