टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात माझ्यासमोर असलेले दोन उमेदवार हे स्वकर्तृत्वावर आमदार होण्याची स्वप्ने न पाहता एक परीचारकांच्या जीवावर, तर दुसरा वडिलांच्या पुण्याईवर आमदार होण्याचे स्वप्न पाहतायत.
वडिलांच्या जीवावर राजकारणात यशस्वी होण्याचे दिवस आता गेले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांनी आज प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील गावांना गाव भेट दौरा आयोजित केला होता. यामध्ये सिद्धेवाडी, तावशी, तनाळी, तपकिरी-शेटफळ, खर्डी गावांचा समावेश होता.
सिद्धेवाडी गावामधील मतदारांशी बोलताना अनिल सावंत यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. परवा आपल्या एका मित्र पक्षाच्या उमेदवाराची सभा झाली.
या सभेत एक अपक्ष खासदार म्हणाले, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार भगीरथ भालके हेच आहेत. मला एक गोष्ट कळत नाही. मुळात हा अपक्ष खासदार आणि यांना महाविकास आघडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकारी कोणी दिला आमचं आम्ही बघून घेऊ.
मरवडे याठिकाणी विशाल पाटील यांची सभा झाली होती. काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ विशाल पाटील यांनी बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका केली होती.
विद्यमान आमदार सांगतात, तीन हजार कोटींची कामे केली. मात्र पंढरपूर मंगळवेढ्यातील अनेक गावात पायाभूत सुविधांची देखील सोय नसल्याचं वास्तव आहे. मग नक्की तीन हजार कोटी गेले कुठे? कॉन्ट्रॅक्टरच यांचीच लोकं असल्यावर तीन हजार कोटी फक्त कागदावरच दिसणार. अशी जहरी टीका महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी नाव न घेता समाधान आवताडेंवर केली.
यावेळी मा. व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, जिल्हाध्यक्ष ओबीसी सौ. शारदा ताई जाधव, सिध्देवाडी सरपंच सारंग जाधव, ग्रा.प सदस्य, बाबुराव गोडसे, आप्पा जाधव, सचिन जाधव, विशाल जाधव, विजय जाधव, सुनील जाधव, आदी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज