mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिक्षक स्वतःघडणारा व विदयार्थ्यांना घडविणारा असावा : दत्तात्रय पाटील

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शिक्षक स्वतःघडणारा व विदयार्थ्यांना घडविणारा असावा : दत्तात्रय पाटील

सुरज फुगारे । शिक्षकाला मातीची भांडी घडविणार्‍या कलाकाराची भूमिका निभावताना विदयार्थ्यांवर सुसंस्कार,नितीमुल्ये,सकारात्मक जीवनदृष्टी याची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातून उदयाचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे शिक्षक स्वतः घडणारा आणि विदयार्थ्यांना घडविणारा असावा असे प्रतिपादन मंगळवेढयाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी केले.

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे सदस्य भिमराव मोरे हे संत दामाजी हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेबद्दल ,दुसरे सदस्य राजेंद्रकुमार जाधव हे संत दामाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी रूजू झालेबद्दल तर माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांची अखिल भाविक वारकरी मंडळाच्या जिल्हा सहअध्यक्षपदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे,माजी अध्यक्ष शिवाजीराव पुजारी,अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी,अध्यक्ष मोहन माळी,न.पा.पक्षनेते अजित जगताप,सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.दत्तात्रय खडतरे आदी उपस्थित होते.

यावेळी पाटील म्हणाले,प्रत्येक विदयार्थी स्वतंत्र तेजबुध्दी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजून घेतला पाहिजे. विदयार्थ्यांमधील प्रकट अवगूण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार  दयायचा असतो. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विदयार्थी हे दोन महत्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकावर सतत परिणाम होत असतो.सध्याच्या माहितीच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी  फार मोठी आहे. विदयार्थी व पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येवून विचार करण्याची वेळ आता आली आहे.कारण उदयाचा समाज हा सतत शिकत राहणार आहे.

यासाठी शिक्षकांची कार्यतत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोटया,मोठया कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षकांनी तत्पर असायला पाहिजे. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते.तसेच वर्गातील वातावरण प्रेरक होते. शिक्षकांची व्यक्तीमत्व जेवढे प्रभावी,परिणामकारक व ज्ञानसमृध्द असेल तेवढे ते विदयार्थ्यांसाठी उपयुक्त असते.

आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी विदयार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे असे त्यांनी सांगितले.सदर प्रसंगी प्रा.शिवाजीराव  पुजारी,अजित जगताप,अ‍ॅड. दत्तात्रय खडतरे आदीनीही आपले विचार व्यक्त केले.

मंगळवेढा तालुका पत्रकार संघास 30 खुर्च्या भेट दिल्याबद्दल अजित जगताप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तसेच अ‍ॅड. दत्तात्रय खडतरे यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रसाद उपस्थितांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी यांनी केले. तर तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

यावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे,बाबासाहेब सासणे,शिवाजी केंगार,पत्रकार समाधान फुगारे, केशव जाधव,म्हाळाप्पा शिंदे, विलास काळे,रामा सप्ताळे, दत्तात्रय कांबळे,दादा लवटे,महेश वठारे,लखन कोंडुभैरी,प्रतिक भगरे,वासूदेव जोशी,रोहिदास भोरकडे आदी उपस्थित होते.

The teacher should be the one who makes himself happen and makes the students: Dattatraya Patil

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedhaSamajikSanskrutikSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा; मंगळवारी एक बळी,नवे 30 पॉझिटिव्ह रूग्ण

सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा; मंगळवारी एक बळी,नवे 30 पॉझिटिव्ह रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा