टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविदयालयातील सन 2001 ते 2003 या बँच मधील बी.ए.बी.कॉम च्या विदयार्थ्यांनीएकत्र येऊन उत्साहात गेट-टुगेदर संपन्न केले. महाविदयालयाच्या प्रागंणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी महाविदयालयाच्या 110 माजी विदयार्थ्यांनी एकत्रित येऊन हजेरी लावली व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अनेकांनी एकमेकांना आनंदा अलिंगन दिले. या वेळी उपस्थितीत वर्गमैत्रिंनीना एकमेकींच्या भेटीमुळे आनंद आश्रृ आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्र.प्राचार्य औदुंबर जाधव हे होते. तर व्यासपिठावर माजी प्राचार्य मारुतीराव जगताप, माजी प्रा.वाघमोडे, प्रा.अशोक खोत, प्रा.करवंदे, प्रा. शहा, प्रा.आर.ए.पवार, प्रा.खंडागळे, प्रा. प्रा.शिवशरण, प्रा.आर.एन.जगताप, प्रा. नवनाथ जगताप, प्रा.गावकरे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रताप सावंजी आदीजण उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष श्री.राहुल शहा व माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी भेट दिली.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला तर वाढत्या वयाचा दाखला देत 21 वर्षात मिळवलेल्या यशबद्दल व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर विद्यार्थ्यांनी सुध्दा आस्थेने आपल्या गुरुंची चौकशी केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्र.प्राचार्य औदुंबर जाधव यांनी विविध क्षेत्रात यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे निमित्ताने प्रा. गावकरे यांनी महाविदयालयास यशाची माहिती दिली व माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयास मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
तर माजी प्राचार्य मारुती जगताप यांनी महाविदयालयाचे इमारत बांधकामापासून महाविद्यालयाच्या तत्कालीन शिस्तीबद्दलच्या आठवणीला उजाळा दिला. प्रा.शिवशरण यांनी गंमतीने इंग्रजी डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांची हजेरी घेत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमात द्वितीय सत्रात मंगळवेढयाचे सुप्रसिध्द कवी इंद्रजित घुले व जीतेंद्र लाड यांनी सादर केलेल्या कवितांनी सगळयांची मने जिंकली. या गेट-टुगेदर चे निमीत्ताने सारिका दत्तु व तेजस्विनी राजमाने यांनी सादर केलेल्या नृत्याने वार्षिक स्नेहसंमेलनाची आठवण सुध्दा झाली तर संगीत खुर्ची सारख्या फनी गेम्समुळे महाविद्यालयाीन जिवनात गेल्याचा आनंद मिळाला.
मिलींद आवताडे यांनी म्हंटलेल्या ‘पल पल दिल के पास’ या गाण्यामुळे तर अनेकांना ह्रदयाच्या नाजुक कोपऱ्यातील जुन्या मैत्रिणीची आठवण झाली. कार्यक्रमाचे स्थळी सर्व विद्यार्थ्यांची माहिती स्क्रीनवर दिवसभर दाखवण्यात आली तर उभारण्यात आलेल्या दोन सेल्फी पाँईटवर फोटो काढयासाठी दिवसभर विद्यार्थ्यांची दंगामस्ती चालु होती. हे दोन्ही उपक्रम कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.
वये वाढली. आवाजात पोक्तपणा आला, सांसारिक व पारिवारीक जबाबदारी वाढली परंतु मनातील विद्यार्थी मात्र गप्प बसु देत नव्हता त्यामुळे अनेकजण आपसात चेष्टा मस्ती करीत असताना दिसत होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन राहिणी पवार, झाकीर काझी, विकास जाधव, आनंद मुढे, संदिप हजारे, अश्विनी नागणे, मेघाली सोनवले, रेश्मा जाधव, विनायक यादव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अतुल मुरडे, वासुदेव जाश्ेाी, संतोष अडगळ, रफीक मुल्ला,
सुधाकर माने, मधुकर मुरडे, मयुर यल्लाटीकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द कवि इंद्रजित घुले व प्रास्ताविक संतोष शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी नागणे यांनी मानले.
दिवस संपला, संध्याकाळ झाली तरी सुध्दा अनेकांचीपावले माघारी आपल्या घरी वळण्यास तयार नव्हती तरी सुध्दा जड अंतकरणाने पुन्हा भेटण्यासाठी या दिवसाची सांगता झिंगाट गाण्याच्या तालावर ग्रुपडान्स ने झाली.
21 वर्षाखालचा आनंद पुन्हा मिळाल्याचा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर ठळपणे जाणवत होता तर या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनामुळे सर्वच आजी माजी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज