mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

coronavirus: ‘ही’ लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
coronavirus: ‘ही’ लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा इशारा

मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या लक्षणांच्या यादीमध्ये डॉक्टरांकडून आणखी काही लक्षणं जोडली गेली आहेत. हैदराबादमधील चेस्ट किंग कोटी (Chest and King Koti) रुग्णालयातील डॉक्टरांनी स्थानिक मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून एक मेडिकल रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात डायरिया, डोकेदुखी आणि उलटी होणं हीदेखील भारतात कोरोना व्हायरसची लक्षणं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

ही लक्षणं सहसा दुर्लक्षित केली जातात आणि बदलत्या हवामानामुळे झालेला आजार किंवा अन्न विषबाधा मानली म्हणून याकडे पाहिलं जातं. परंतु, कोरोना व्हायरस आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हवामानानुसार आपली जीनोमिक रचना बदलत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.  coronavirus: Do not ignore ‘these’ symptoms, doctor’s warning

सामान्यत: खोकला, ताप, श्वासोच्छवास घेण्यास त्रास यासारखी लक्षणं दिसून आल्यानंतरच एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्गाची चाचणी करुन त्यावर उपचार केले जातात. परंतु आता असेही रुग्ण आढळत आहेत, ज्यांना सुरुवातीला डायरिया, डोकेदुखी आणि उलटी होण्याची समस्या होती आणि त्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. उपचार करण्यात उशिर झाल्यानेही अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

हैदराबादमध्ये 20 जून ते 30 जूनपर्यंत 67 पैकी 30 रुग्णांचा मृत्यू उपचारास उशिर झाल्याने झाल्याच सांगण्यात आलं आहे. वेगवेगळ्या लक्षणांमुळे, रुग्णांना संसर्ग ओळखण्यास उशीर झाला आणि यामुळे ते उशिरा उपचारासाठी दाखल झाले. जर एखाद्या व्यक्तीला डायरिया अर्थात अतिसार, डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असेल तर अशा लोकांनीदेखील कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

रिपोर्टनुसार, डायरिया सामान्यपणे हवामानातील बदलामुळे झालेला आजार मानला जातो. पण कोरोना व्हायरस आता फुफ्फुसांपेक्षा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर (Gastro-intestinal tract) हल्ला करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे डायरिया, उलटी आणि डिहायड्रेशन होतं. परिणामी अशक्तपणा, ऑक्सिजनची पातळी कमी होणं, कमी रक्तदाब आणि साखर कमी होणं आणि अचानक बेशुद्धपणा यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच, डॉक्टरांनी डायरिया अर्थात अतिसार किंवा तीव्र डोकेदुखी असलेल्या लोकांची देखील कोरोना तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन वेळेत संसर्ग ओळखण्यास मदत होऊ शकते, असं म्हटलं आहे.

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
टेंशन वाढणार! शिवसेनेत परतण्याबाबत त्या नगरसेवकांनी घेतली ही भूमिका

टेंशन वाढणार! शिवसेनेत परतण्याबाबत त्या नगरसेवकांनी घेतली ही भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत ‘जनता दरबार’ भरवा; ‘एक दिवस गावासाठी’ अभियानाची आग्रही मागणी; ​प्रशासकीय पारदर्शकता आणि शहर विकासासाठी नागरिकांचे थेट साकडे

May 11, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा