टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ९२८ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांचे दोन महिन्यांचे थकीत, ग्रामपंचायत कार्यालयातील दोन हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्यासह,
मागील तीन वर्षांतील वाढीव मानधनातील फरक असे एकूण नऊ कोटी रुपयापेक्षा अधिक मानधन त्वरीत वितरीत करण्यात आले.
ग्रामविकास विभागाच्या पंचायतराज संचालक गिरीश भालेराव यांनी दिवाळी त्यासंदर्भातील आदेश दिले होते. सर्व ११ पंचायत समितीमार्फत संबंधित ग्रामपंचायतीस त्याचे वितरण करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील ९२८ सरपंच, ८५२ उपसरपंच यांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे मानधन थकीत होते. सरपंचांना ४ हजार व उपसरपंच यांना दोन हजार रुपये मानधन मिळते.
तसेच, ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या १,८२८ कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे १ कोटी ७३ लाख रुपये मानधन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एकूण २१७४ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या कालावधी मधील फरकाचे ७ कोटी ७० लाख रुपयांचे मानधन वितरीत झाले.
सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन दोन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, असे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज