टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ३ उमेदवारांनी ४ अर्ज दाखल केले.
विशेष म्हणजे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या भगीरथ भालके यांनी काल शुक्रवारी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पंढरपूरच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढलेला आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी शुक्रवार (दिनांक 25) ऑक्टोबर १७ जणांनी २१ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. ९३ जणांनी १२० उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत.
गुरुवारी ५ अर्ज दाखल झाले होते तर शुक्रवारी आणखी तीन उमेदवारांनी चार अर्ज केले आहेत. गुरुवारी भगीरथ भालके यांनी स्वतः तर शुक्रवारी भालके यांच्यासाठी काँग्रेसकडून सूचक संदीप माधव पाटील यांनी अर्ज दाखल केला.
माढ्याचा पेच मीनल साठे यांचे महायुतीकडे लॉबींग
बहुप्रतिक्षेत असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी कोणाच्या हाती येणार हा पेच कायम आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाचा अर्ज घेतल्याने नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. सावंत यांनी अपक्ष अर्ज घेतल्याने राजकीय नवे रंग पाहण्यास मिळत आहेत. आमदार बबन शिंदे व विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील या दोघांमध्ये तुतारीची रस्सीखेच सुरू आहे.
आ.शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट व अपक्ष अर्ज दाखल केला. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सावंत यांनी अपक्ष तर पृथ्वीराज सावंत यांनी अजित पवार गटाकडून अपक्ष अर्ज घेतला आहे.
सांगोल्यात ५ जणांचे अर्ज
सांगोला विधानसभा मतदारसंघातून ६६ उमेदवारांनी ९५ अर्ज नेले आहेत. न्यू राष्ट्रीय समाज पक्षातर्फे एकाने व अपक्ष चार असे पाच जणांचे अर्ज दाखल आहेत. महा आघाडीतून शेकापला जागा सोडल्याचे भासवत असून ठाकरे सेनेने दीपक साळुंखे यांची उमेदवारी जाहीर केल्याने पेच कायम आहे.
मोहोळमधून दोन अर्ज
मोहोळ मधून चार दिवसांत ४५ जणांनी ९५ उमेदवारी अर्ज नेले आहेत. शुक्रवारी ११ जणांनी २६ उमेदवारी अर्ज नेले आहेत. शुक्रवारी रॉकी बंगाळे, संजय वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यशवंत माने यांच्यासह तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज