मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती रेणुका मोटे (रविवार पेठ, सोलापूर) यांचा साडीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी तिचा आरोपी पती हनुमंत मोटे याच्याविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. The husband strangled the pregnant woman on suspicion of murder
हनुमंत मोटे व त्याची पत्नी रेणुका यांना दोन मुले आहेत. रेणुका या तिसर्यांदा गर्भवती होत्या. हनुमंत मोटे हा नेहमी रेणुकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वाद होत असे. बुधवारी (दि. 8) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हनुमंत मोटे हा घरी आला. त्याने पुन्हा पत्नी रेणुका हिच्याशी चारित्र्याच्या संशयावरून भांडण काढले.
यावेळी मोटे याने पत्नी रेणुका हिचा साडीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला.
रेणुका निपचित पडल्यानंतर पती घरातून पळून गेला. ही घटना जेलरोड पोलिसांना समजताच पोलिस अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून रेणुका मोटे हिचा मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी शेजारी व मोटे यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता गर्भवती रेणुकाचा खून तिचा पती हनुमंत मोटे यानेच केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज