टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तीवर अत्याचार झाला त्या विरोधात प्रहार संघटनेने लगेच निवेदन दिले होते तेव्हा तपास सुरू झाला.
कालांतराने तपास शांत झाला त्यामुळे मंगळवेढा पोलीस हे अपयशी ठरत आहेत त्या विरोधात प्रहारने आक्रमक भूमिका घेतली आहे गेली आठ महिने झाले हा तपास होत नाही.
त्यामुळे प्रहारचे अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दोन वेळा निवेदन दिले होते तरीही तपास शांत सुरू आहे आरोपीला तात्काळ अटक करा नाहीतर आंदोलन करू असा इशारा प्रहारने आज निवेदनात दिला आहे.
मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महेश ढवाण यांनी तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही मी तपास जलद गतीने करून त्या आरोपींना तात्काळ अटक करेन असा शब्दही दिला.
निवेदन देताना प्रहारचे अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष युवराज टेकाळे, तालुका संपर्कप्रमुख शकील खाटीक, नानासो कोळेकर, किरण शेवडे, सर्जेराव पारधी, तन्मय कांबळे,
संतोष ढेकळे, प्रसाद सलगर, राजू पावले, पांडुरंग विभुते, सतीश ठेंगील, राम रेवे, सावित्रीबाई चौखंडे, शेख ,धनंजय माने व इतर दिव्यांग बांधव व भगिनी निवेदन देताना उपस्थित होते.
यावेळी प्रहारचे समाधान हेंबाडे यांनी जर तपास नाही लागला तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही दिला आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज