टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी नगरमधील जल जीवन मिशन अंतर्गत पाईप लाईनचे ७० टक्के काम पूर्ण झालेले असून मंगळवेढा एमआयडीसीकडून जागा मिळत नसल्याने त्या टाकीचे काम जागेअभावी रद्द होत आहे.
त्यामुळे एमआयडीसीकडून टाकीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी येथील सरपंच जमीर सुतार, उपसरपंच संजय जगताप यांच्यासह सर्व सदस्य आज दि. २ ऑक्टोबर गांधी जयंती दिनी प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र कार्यालय चिंचोली सोलापूर येथे अन्नत्याग उपोषण करणार आहेत
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत संत दामाजीनगर ही जिल्ह्यात मोठी ग्रामपंचायत असून २० जुलै २०१३ रोजी नव्याने स्थापन झालेली असून, संत दामाजीनगर गावासाठी इतर कोणतीही पिण्याच्या पाण्याची योजना नाही.
३० ऑगस्ट २०२२ नुसार शासन निर्णयानुसार जल जीवन मिशन अंतर्गत आंधळगाव व इतर ३ गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. त्यामध्ये संत दामाजीनगर येत असून त्यानुसार जल जीवनच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी येथे टाकी बांधण्याचे निश्चित केल्याने
ग्रामपंचायत दामाजीनगर यांनी क्षेत्र व्यवस्थापक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र कार्यालाय सोलापूर यांच्याकडे पाण्याच्या टाकीसंदर्भात मंगळवेढा एमआयडीसीमधील ओपन स्पेस जागेमधील मागणी केल्यानंतर त्यांनी लेखी स्वरुपात काही त्रुटीची पूर्तता करण्याची मागणी केली.
त्यानंतर ग्रामपंचायत संत दामाजीनगरने त्रुटीची पूर्तता केलेली होती. याबाबत एमआयडीसी यांना गावाला पुरवठा करून शिल्लक राहिलेले पाणी मागणीनुसार पाणी देण्याचा ग्रामपंचायतने ठराव देखील दिलेला आहे. जागा उपलब्ध व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील टाकीसाठी जागा मागणीबाबत संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आज दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र कार्यालय सोलापूर, चिंचोली येथे अन्न त्याग उपोषण करणार असल्याने एमआयडीसीचे अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
गेल्या दोन वर्षापासून मागणी करून देखील संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने उपोषणाचे हत्यार उपसावे लागले असल्याचे सरपंच जमीर सुतार यांनी सांगितले.
उद्योग वाढीस खिळ
सदर पाण्याच्या टाकीची जागा जल जीवन मिशन अंतर्गत योजनेमध्ये मंगळवेढा एमआयडीसीमध्ये बांधण्यासाठी त्यांच्या पातळीवरुन नकाशामध्ये नमूद केलेले होते. सदरची एमआयडीसी संत दामाजीनगर हद्दीमध्ये येत असून व त्या ठिकाणी एमआयडीसी उद्योगासाठी कोणतीही दुसरी पाण्याची योजना नाही. यामुळे उद्योग वाढीस खिळ बसत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज