टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री संत दामाजी कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली (एन.सी. डी.सी.) यांच्याकडून कारखाना उभारणीपासूनच्या इतिहासात प्रथमच ९४ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल
माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा कृतज्ञता सत्कार सोहळा आणि भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आज दि.२१ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
यावेळी चेअरमन पाटील म्हणाले, दामाजीच्या आर्थिक अडचणीच्या काळात स्व.सुधाकर परिचारक यांनी पांडुरंगाची भूमिका निभावली होती.
तीच परंपरा माजी आमदार प्रशांत परिचारक निभावत असून त्यांनी अडचणीतील दामाजीला केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक मेसेज टाकून दामाजीला मदत करावी, असे सांगितले.
त्यानुसार दामाजीला ९४ कोटी प्राप्त झाले असून त्या मदतीमुळे बँकांची थकीत देणी, शेतकऱ्यांची बिले, कामगारांच्या पगारी, थकीत देयके देण्यास मदत झाली असून आर्थिक अडचणीत असलेल्या दामाजीला ऊर्जितावस्था येण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या सत्कार सोहळ्याचे व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजी काळुंगे, प्रमुख पाहुणे विठ्ठल सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके तसेच रतनचंद शहा अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, रामचंद्र वाकडे,
अॅड. नंदकुमार पवार, बळीराजाचे चेअरमन दामोदर देशमुख, यादाप्पा माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे.
यावेळी ऊस पीक परिसंवाद आयोजित केला असून प्रमुख वक्ते सुरेश माने-पाटील यांचे ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयावर तर अरुण देशमुख यांचे ठिबक सिंचन प्रणाली वापर या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर, कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज