टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील नऊ वर्षात १२ आंतरराष्ट्रीय आणि ७ राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे आणि शैक्षणिक १२ पेटंटचे धनी असलेले बार्शी येथील शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले गुरुजी यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने छळाची तक्रार दाखल केली आहे.
लातूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल झाली असून, न्यायालयाने गुरुवारी (दि.१९) डिसले गुरुजींसह चौघांना नोटीस बजावली असल्याचे वृत्त आज दिव्य मराठीने प्रसिद्ध केले आहे.
डिसले गुरुजींचा विवाह लातूर शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिक्षकाच्या मुलीशी २७ जानेवारी २०१९ रोजी झाला. त्यांच्या पत्नीला राज्य शास्त्रात करिअर करण्याची इच्छा होती.
पत्नीने दिलेली तक्रार अशी…
डिसले गुरुजींनी वरदक्षिणा म्हणून २ लाख २१ हजार रुपये हुंडा, ११ तोळे सोने आणि पेहरावासाठी २० हजार रुपये घेतले होते. लग्न झाल्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेसाठी सासू-सासरे निघाले असता येताना सोन्याची वेल घेऊन या अन्यथा घरात पाय ठेवू नका असे त्यांनी सांगितले.
नंतर सासू, सासरे, नणंद आणि गुरुजी यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला सुरुवात झाली. त्यातच २०२० मध्ये त्यांना मुलगा आणि २०२२ मध्ये एक मुलगी झाली. मुलाचे लाड सुरू झाले परंतु मुलीला गुरुजी जवळही येऊ देत नव्हते.
यातून वाद विवाद सुरू झाले. त्यामुळे गुरुजींच्या पत्नी नोव्हेंबर २०२३ मध्ये माहेरी राहण्यास आल्या. त्यांनी डिसले गुरुजी, त्यांचे आई वडील आणि बहीण अशा चौघांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली.
गुरुवारी या प्रकरणाची पहिली तारीख प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी (तिसरे) न्या. श्रीमती जे. जे. माने यांच्यासमोर पार पडली. त्यानंतर न्यायालयाने या सर्वांना शनिवारी (दि. २१ सप्टेंबर) न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.
प्रकरण ६ महिने महिला तक्रार निवारण केंद्रात
डिसले गुरुजी यांच्या २९ वर्षीय पत्नीने नोव्हेंबर २०२३ मध्ये लातूरच्या महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पती रणजितसिंह डिसले, सासरे माधव हरिश्चंद्र डिसले, सासू हिराबाई डिसले आणि नणंद प्रियंका पाटील यांना समुपदेशनासाठी लातूर येथे बोलावण्यात आले.
परंतु डिसले गुरुजी आणि त्यांचे वडील असे दोघेच हजर झाले. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये डिसले गुरुजींनी मी या पुढे पत्नीस त्रास देणार नाही असे सांगत, त्यांना पुन्हा सासरी घेऊन जाण्याची तयारी दाखवली. परंतु पुढे काहीच झाले नाही.
डिसले गुरुजींच्या विरोधात पत्नीने दिलेली तक्रार अशी
माहेरी बोलण्यासाठी डिसले गुरुजी समोर थांबून बोलण्यासाठी ५ मिनिटांचा वेळ देतात. माहेरच्या सगळ्यांचे मोबाइल नंबर रिजेक्ट लिस्टमध्ये टाकले. जावयाला मानपान करीत नाही, करणी-धरणी नाही, घरघुसणी नाही म्हणून टोमणे मारून छळ करतात. गर्भवती असताना बेल्टने मारहाण केली
अमेरिकेत असल्याने संपर्क होऊ शकला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रणजितसिंह डिसले गुरुजी अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांची बाजू समजून घेण्यासाठी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी तो उचलला नाही. त्यानंतर त्यांना एसएमएस आणि व्हॉट्सअप कॉल केल्यानंतरही त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज