टीम मंगळवेढा टाईम्स ।
थोर मराठा आण्णासाहेब पाटील यांच्या ९२ जयंतीनिमित्त मराठा महासंघाच्या चळवळीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन डोरले यांनी दिली.
या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष म. बाबू इनामदार (मरणोत्तर), मराठा नागरी पतसंस्थेचे माजी संचालक मुरलीधर सारडा,
सेवानिवृत्त बँक अधिकारी रमेश शिंदे, माजी नगरसेवक दत्तात्रय यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव शिवाजीराव वाकडे यांना समाजरत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
सदरचा कार्यक्रम बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा. ढगे डिजीटल समोर, जवाहरलाल प्रशालेशेजारील मैदानात होणार असल्याचे सचिन डोरले यांनी सांगितले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज