टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या वतीने रविवार दि.२२ सप्टेंबर रोजी इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे मनसे केसरी-२०२४ जंगी कुस्ती मैदानाचे उद्घाटन नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड व छत्रसाल स्टेडियम दिल्लीचे पै.आशिष हड़ा यांच्यामध्ये ५ लाख रुपयांची कुस्ती होत आहे.
महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख व दिल्लीचे पै. दिपक कुमार यांच्यामध्ये ५ लाख रुपयांची कुस्ती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत १०० रुपयापासून ५ हजारांपर्यंतच्या कुस्त्या जोडण्यात येतील तर मैदानाची वेळ दुपारी ३.०० वा. असेल,
गंगावेस तालीम कोल्हापूरचे पै. माऊली जमदाडे व हरियाणाचे पै. रोहित दलाल यांच्यामध्ये दोन लाखांची कुस्ती, कोल्हापूरचा पै. उमेश चव्हाण व काका पवार तालीमचे पै. संग्राम साळुंखे यांच्यात १ लाखाची कुस्ती,
पंढरपूरचे पै.तात्या जुमाळे व पै. विजय शिंदे यांच्यात १ लाख रुपयांची कुस्ती, काका पवार तालीमचे ज्योतिबा आटकळे व सह्याद्री संकुल पुणेचे पै.संग्राम अस्वले यांच्यात ७५ हजार रुपयांची कुस्ती,
जयमल्हार कुस्ती संकूल मंगळवेढाचे वस्ताद मारुती वाकडे यांचा पै. सौरभ घोडके व विठ्ठल आखाडा पंढरपूरचे पै.सुनिल हिप्परकर यांच्यात ५० हजार रुपयांची कुस्ती होणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसही जाहीर करण्यात आलेले आहेत.
यावेळी महाराष्ट्र केसरी पै. समाधान घोडके हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच अर्जुन अॅवार्ड, हिंद केसरी, रुस्तूम ए हिंद, मल्ल सम्राट, कुस्ती सम्राट, भारत भिम, तसेच महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन, राष्ट्रकुल सुवर्णपद विजेते
तसेच कुस्ती शौकिन, पैलवान व आजी म ाजी वस्ताद उपस्थित राहणार आहेत. मैदान शुभारंभ कुस्ती पै. करण बंदपट्टे विरूध्द पै. वैभव साठे, पै. अर्जुन बंदपट्टे विरूध्द पै. राजवर्धन पाटील अशी कुस्ती होईल.
पै. प्रणित भोसले विरूध्द पै. सागर चौगुले, पै. समाधान कोळी विरूध्द पै. सुमित आसबे, पै. बालाजी मळगे विरूध्द पै. समर्थ काळे, पै. विजय धोत्रे विरूध्द पै. अजय नागणे, पै. कामण्णा धुमुकनाथ विरूध्द पै. राजेंद्र नाईकनवरे, पै. दिग्विजय वाकडे विरूध्द पै. अमर मळगे, पै. रणजित घोडके विरूध्द पै. शंकर गावडे, पै. यश धोत्रे विरूध्द पै. शंतनू शिंदे अशा कुस्त्या होणार आहेत.
आखाडा प्रमुख म्हणून मारुती वाकडे, दामोदर घुले, भिमण्णा माळी, सोमनाथ बुरजे, महेंद्र देवकते हे काम पाहणार असून समालोचन पै. धनाजी मदने, अशोक धोत्रे, ज्ञानेश्वर आस्वले हे करणार आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज