mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Big Breaking! विधानसभा निवडणुकीचा बिगुल ‘या’ महिन्यामध्ये, मतदान दिवाळीनंतर, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलावली आज व उद्या बैठक; ‘या’ बाबींचा होणार आढावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 12, 2024
in राज्य
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

टीम मंगळवेढा टाईम्स ।

निवडणुकीच्या दीड-दोन महिने अगोदर सर्व जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेतला जातो. मतदार याद्या अंतिम झाल्या, ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी झाली, मतदान केंद्रे निश्चित झाली, सहायक निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले, निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली.

या पार्श्वभूमीवर आता आज सर्व जिल्ह्यांमधील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी बैठक बोलावली असून उद्या शुक्रवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल.

त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता जाहीर होऊन दिवाळीनंतर मतदान होईल, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

२०१९ मध्ये राज्यातील २८८ जागांसाठी एकाचवेळी २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला. परंतु, राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे सत्ता स्थापन करण्यासाठी २३ नोव्हेंबरची पहाट उजाडली.

तोवर राज्यात राष्ट्रपती राजवट होती. पहाटेच्या शपथविधीनंतर ते सरकार कोसळले आणि पुन्हा नवीन समिकरणांची जुळणी करून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात बसले.

दरम्यान, आता २३ नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन न झाल्यास राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते. ही बाब महायुती सरकारला परवडणारी नाही. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना,

वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याशिवाय मुलींना मोफत उच्चशिक्षण, अशा योजनांमधून राज्य सरकारने सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक वेळेत झाल्यास आपल्यालाच लाभ होईल, असा विश्वास सत्तेतील काही घटकांना आहे.

दुसरीकडे मागील दोन-तीन निवडणुका हरियाणासोबत झाल्या, पण आता निवडणूक लांबणीवर पडल्याने सरकारवर टीका होवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर २३ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घेण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

‘या‘ बाबींचा होणार आढावा

मतदान केंद्रे निश्चिती व अंतिम मतदार यादी, ईव्हीएमची संख्या, प्रथमस्तरीय चाचणी, उपलब्ध पोलिस बंदोबस्त, निवडणूक कामासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी, मतदान साहित्य व मतमोजणीची तयारी

आज मुंबईत आढावा बैठक

निवडणुकीपूर्वी साधारणत: दीड-दोन महिने अगोदर तयारीचा आढावा घेतला जातो. ईव्हीएमसह अंतिम मतदार यादी, निवडणूक कर्मचारी, पोलिस बंदोबस्त अशा विविध बाबींचा आढावा होतो.

आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वच उपजिल्हाधिकाऱ्यांची (निवडणूक) बैठक बोलावण्यात आली आहे.- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर(स्रोत;सकाळ)

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहिर

संबंधित बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

समाधानकारक पाणीसाठा! उजनी धरणाचे 16 दरवाजे बंद, कॅनॉलचे पाणी 'या' तारखेपर्यंत सुरु राहणार; 'या' तीन उपसा सिंचन योजना यंदा होणार कार्यान्वित

ताज्या बातम्या

आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा