टीम मंगळवेढा टाईम्स।
बाल विकास प्रकल्प अधिकारी शहर पूर्व सोलापूर व रॉकेट लर्निग यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत सहाव्या पोषण माह 2024 चा उद्घाटन कार्यक्रम शेळगी बिट मध्ये पार पडला. या कार्यक्रमास पालक, किशोरवयीन मुली व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे नियोजन किरण जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी व श्रीम. सुनिता बनसोडे मॅडम, पर्यवेक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका श्रीम.अनिता म्हमाणे, यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका श्रीम.सुमन दोरकर,यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित गर्भवती मातेच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक नितीन थोरात, इ आकार, जिल्हा समन्वयक, रॉकेट लर्निग, सोलापूर हे लाभले. त्यांनी पोषण माहचे महत्व उपस्थित लोकांना सांगितले.
तसेच अंगणवाडी कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त पालकांपर्यंत अंगणवाडीचे कार्यक्रम पोहोचवावे या बाबत मार्गर्शन केले. तसेच खालील मुद्यांवर उपस्थितांशी संवाद साधला .
१. पोषक घटकांनी समृद्ध आहार
फळे, भाज्या, पूर्ण अन्नधान्ये, डाळी, दुग्धजन्य उत्पादने आणि पौष्टिक खाद्यपदार्थ समाविष्ट करून पोषक घटकांनी समृद्ध आहार केंद्रित करणे आवश्यक आहे.
२. आरोग्यदायी आहार सवयी – नियमित जेवण करणे, पुरेसे पाणी प्यायणे आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन कमी करणे आवश्यक आहे.
३. अन्न सुरक्षा -सर्वांसाठी पुरेसे आणि पोषक घटकांनी समृद्ध अन्न उपलब्ध करणे महत्वाचे आहे.
४. शिक्षण आणि जागरूकता – पोषणाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी व्यापक शिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
तसेच त्यांनी असे स्पष्ट केले कि , पोशन अभियान – 2024 आपल्या देशासाठी आशावादी दृष्टी प्रदान करतो जो देश्याच्या निरोगी आणि पौष्टिक भविष्यासाठी कार्य करतो.
या अभियानाचा उद्देश एक उत्तम भारत निर्माण करणे हा आहे, जिथे प्रत्येक नागरिक निरोगी, सशक्त आणि सक्षम असेल.
कार्यक्रमाचा समारोप शेळगी बिट मधील अंगणवाडी सेविका श्रीम. वंदना सुरवसे यांनी केला.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज