टीम मंगळवेढा टाईम्स ।
लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून या योजनेत अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहे. सध्या ऑगस्ट महिन्याचे अर्जाची छाननी सुरु आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात 45-50 लाख महिलांना पैसे मिळणार आहे.
लाभार्थी महिला
राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर झाले आहेत.
दोन हफ्ते
ज्या महिलांनी १० ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना आतापर्यंत दोन हफ्ते आले आहेत.
३००० रुपये
अशा महिलांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून ३००० रुपये आले आहेत.
एकूण तीन हफ्ते
आता त्यानंतर फॉर्म भरलेल्या म्हणजेच ३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना एकूण तीन हफ्ते येणार आहेत.
१५०० रुपये
अशा महिलांना ४५०० रुपये येणार आहेत. तर आधी दोन हफ्ते मिळालेल्या महिलांना १५०० रुपये येणार आहेत.
१४ ते १७ ऑगस्ट
या योजनेचा पहिला हफ्ता १४ ते १७ ऑगस्ट च्या मध्ये देण्यात आला होता.
एका महिन्याच्या कालावधीने
मिळालेल्या माहितीनुसार, आता पुढील हफ्ता हा एका महिन्याच्या कालावधीने म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या १४ ते १७ तारखेच्या मध्येच मिळण्याची शक्यता आहे.
१५ तारखेच्या आसपास
३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ पकडून हा हफ्ता १५ तारखेच्या आसपास मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय.
सप्टेंबर महिन्यात मिळणार तीन महिन्यांचे पैसे
‘आपल्या बहिणींचं इतकं निखळ प्रेम मिळतं तर त्यांच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही म्हणता ना की १० टक्के लोकांनाही फायदा मिळणार नाही आणि आता दीड कोटी बहिणींना याचा पैसा जातोय. तीन हजार रुपये सव्वाकोटी खात्यात गेले आहेत.
उर्वरित खात्यातही पैसे जायला सुरुवात झाली आहे. कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, ३१ ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्जधारकांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. कोणाही बहिणीला वंचित ठेवणार नाही’, असंही ते म्हणाले.
‘सप्टेंबरमध्येही फॉर्म घेऊ, जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. पण काही लोक योजना बंद करण्याच्या मागे लागले आहेत.
काही लोक हायकोर्टापर्यंत गेलेत. हायकोर्टाने चपराक केली, ते थांबवू शकले नाही. मग रोज नवनवीन गोष्टी बोलतात. योजना बंद करण्याचा प्रयत्न करतात’, अशी टीकाही त्यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज