टीम मंगळवेढा टाईम्स ।
बदलापुरात दोन शालेय विद्यार्थिंनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल.
या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. तर काही ठिकाणी आंदोलने होत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येणार आहेत.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन करण्यात येणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवसेना भवनाजवळ आंदोलन करणार आहेत.
तर राष्ट्रवादी पवार गटाकडून शरद पवार हे पुण्यात मूक आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत.
तर काँग्रेसकडूनही काळा झेंडा आणि काळी पट्टी बांधून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. महाविकासआघाडीचे नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे संयुक्त आंदोलन करत आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बदलापूर घटनेच्या निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईच्या शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन केले जाणार आहे.
यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते काळी रिबीन बांधून या घटनेचा आणि सरकारचा निषेध करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज बांधण्यात आला आहे. तसेच शिवसेना भवनाबाहेर मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे.(स्त्रोत:TV9 Marathi)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज