टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर येथे 2022- 23 मध्ये पंधराव्या वित्त आयोगातून सार्वजनिक वाचनालय मंजूर झाले होते. त्याचे काम 23 -24 मध्ये नंदुर हद्दीत पूर्ण झाले. तेव्हापासून ते आज तागायत माजी सरपंच व सध्या त्यांची पत्नी ग्रामपंचायत सदस्य यांनी या वाचनालयाचा गैरफायदा घेत आहे. त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह त्यात सुरू केला आहे.
एकीकडे मंगळवेढा तालुक्यात सगळ्यात जास्त शिक्षक या बालाजी नगर मध्ये आढळून येतात, त्यामुळे भरती किंवा स्पर्धा परीक्षा त्यासाठी भरपूर प्रमाणात बालाजी नगर मधील मुलं तयारी करत असतात.
परंतु त्यांना वाचनालयासाठी किंवा अभ्यासासाठी माळरानाचा आधार घ्यावा लागत आहे. मग हे सार्वजनिक वाचनालय असून अडचण नसून, खोळंबा अशी नागरिकांतून किंवा गावकऱ्यातून चर्चा होत आहे. याला वाचा फोडण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आले आहे.
सध्या गावांमध्ये सांस्कृतिक भवनावरती तिन मजली इमारत, समाज मंदिरात चालत असलेली पतसंस्था, सार्वजनिक वाचनालयात चालत असलेला संसार ही मंगळवेढा तालुक्यात चर्चेचा विषय होत आहे. पुढार्यांनी अख्खा गावचं खाल्ला आहे. हे सिद्ध होत आहे.
याचा पाठपुरावा प्रहार करत आहे. त्यामुळे प्रहार संघटनेने यांचा संसार तिथून हलवावा व गावातील विद्यार्थी विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाचनालयाच्या ठिकाणी त्या वाचनालयाचा वापर होण्यासाठी प्रहार प्रयत्न करणार आहे. तसेच गावकऱ्यांना खुले करून देणार आहे.
याचे निवेदन मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. जर हे सार्वजनिक वाचनालय लवकर खुले झाले नाही तर मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सिदराया माळी,
समाधान हेंबाडे, राकेश पाटील ,युवराज टेकाळे, रोहिदास कांबळे, तानाजी पवार यांना सोबत घेऊन बेमुदत धरणे आंदोलन मी करणार आहे. असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजय राठोड यांनी सांगितले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज