टीम मंगळवेढा टाईम्स।
पंतप्रधानानी क्षयरोगमुक्त भारताचे उद्दीष्ट २०२५ ला पूर्ण कराण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टीबी मुक्त अभियानातून सोलापूर जिल्ह्यातून एकूण ५३ ग्रामपंचायतीची टीबी मुक्त गाव म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातून एकमेव आंधळगाव या ग्रामपंचायतीने टीबी मुक्त गाव होण्याचा मान मिळवला आहे.
आंधळगाव येथे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेली जनजागृती व त्यावरील राबविलेल्या उपाययोजनाचे फलित म्हणून तालुक्यातील ग्रामपंचायतीने होण्याचा मान आहे.
नुकतेच मंगळवेढा आंधळगाव क्षयरोगमुक्त मिळवला आंधळगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते महात्मा गांधींजींचा पुतळा व प्रशस्तीपत्र देऊन सोलापूर येथे गौरविण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे,
मंगळवेढा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, सरपंच लव्हाजी लेंडवे, ग्रा.प. सदस्य संतोष शिंदे, आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव क्षयरोग पर्यवेक्षक मोहन राजगुरू, प्रल्हाद नाशिककर उपस्थित होते.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत स्वप्न पुर्ण कराण्याचे ठरविले आहे. गाव पातळीवरील आरोग्य केंद्र विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीच्या पाठिंब्याने क्षयरोग दुरिकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले.
वर्षभरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्याने गावाला क्षयरोग मुक्त करता येणे शक्य झाले आहे. पहिल्याच प्रयत्नात ग्रामपंचायतीने या अभियानात यश मिळाल्याने गावासाठी ही आनंददायी बाब असल्याचे सरपंच लव्हाजी लेंडवे सांगितले.
तर शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे अवलोकन करून गावाला घेऊन विविध उपक्रमात विकासाच्या दिशेने जाणाऱ्या आंधळगाव ग्रामपंचायतीने टीबीमुक्त गाव अभियानात सहभागी होत.
ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केले. येणाऱ्या काळातही ग्रामपंचायत आरोग्य, पाणी, स्वच्छता व शिक्षण या चतुसूत्री कार्यक्रमांमध्ये कुठेही मागे राहणार नसल्याचे आरोग्य समितीचे सदस्य तथा दामाजी शुगरचे संचालक दिगंबर भाकरे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज