टीम मंगळवेढा टाईम्स ।
धनश्री व सीताराम परिवाराने सभासदांचा विश्वास निर्माण केल्याने चालू आर्थिक वर्षात धनश्री व सीताराम परिवारातील आर्थिक संस्थेची दोन हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे.
सर्वसामान्यांच्या तसेच जिल्ह्यातील साखर कारखानदारीच्या आर्थिक जडणघडणीत ‘धनश्री’चे मोठे योगदान राहिल्याचे प्रतिपादन धनश्री व सीताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले.
धनश्री महिला पतसंस्थेची २८ वी, धनश्री मल्टीस्टेटची १३ वी व सद्गुरू सीताराम महाराज अर्बन सोसायटीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा वीरशैव मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे झाली. याप्रसंगी प्रा.शिवाजी काळुंगे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभा काळुंगे, व्हाईस चेअरमन शांताबाई धायगोंडे, धनश्री मल्टिस्टेटचे व्हाईस चेअरमन युवराज गडदे, सीताराम महाराज अर्बन सोसायटीचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण वाघमोडे,
जकराया शुगरचे चेअरमन अॅड. बिराप्पा जाधव, संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, धनश्री महिला पतसंस्थेचे लेखापरीक्षक आनंद करवंदे, नीलकंठ वाघचौरे,
कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, अॅड. दीपाली काळुंगे-पाटील, यादाप्पा माळी, डॉ. एम.आर. टकले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.शोभा काळुंगे, सद्गुरू सीताराम साखर कारखाना खर्डी युनिट-१ व आष्टी शुगर युनिट-२ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. काळुंगे-गायकवाड, जकरायाचे चेअरमन अॅड. जाधव, दामाजीचे चेअरमन पाटील, दीपाली काळुंगे-पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव जावीर यांनी केले.
यावेळी धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत यांनी ३१ मार्च अखेर संस्थेकडे ६४७ कोटी ०९ लाख ठेवी असून, त्यामध्ये गतवर्षापेक्षा ८८ कोटी ९१ लाख इतकी वाढ झाल्याचे सांगत आर्थिक वर्षात २ कोटी २५ लाख इतका नफा झाल्याचे सांगितले.
धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांनी ३१ मार्च अखेर संस्थेच्या ९०७ कोटी ४७ लाख ठेवी असून, गतवर्षापेक्षा १८१ कोटी १४ लाख ठेवींची वाढ झाल्याचे सांगत आर्थिक वर्षात ४ कोटी ५८ लाख इतका नफा झाल्याचे सांगितले.
श्री सद्गुरू सीताराम महाराज अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे सरव्यवस्थापक लक्ष्मण पवार यांनी संस्थेच्या १४ कोटी २३ लाख ठेवी असून, आज अखेर ७ कोटी ४७ लाख ठेवींची वाढ झाल्याचे सांगत आर्थिक वर्षात १२ लाख ८३ हजार इतका नफा झाल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज