टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका २३ वर्षीय विवाहितेस तू माहेरच्या लोकांशी बोलायचे नाही ते तुला चुकीचे शिकवतात या कारणावरुन माहेरी येवून तिला व तिचे वडिल, भाऊ यांना काठीने मारहाण करुन
तु तक्रार दिल्यास तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी पती विनायक दत्तात्रय गडदे, सासरे दत्तात्रय गेना गडदे, दीर सचिन दत्तात्रय गडदे (सर्व रा.पाठखळ) या तिघाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील जखमी फिर्यादी पल्लवी विनायक गडदे (वय २३) हिचा विवाह पाठखळ येथील विनायक दत्तात्रय गडदे यांच्याशी सन २०१८ साली झाला होता.
यांना पियुष व विवेक अशी दोन मुले आहेत. फिर्यादीचा पती तथा आरोपी तु माहेरच्या लोकांशी बोलायचे नाही, तुला ते चुकीचे शिकवतात या कारणावरुन सतत भांडणतंटा करीत असत.
मे २०२४ पासून आरोपी पतीने पत्नी तथा फिर्यादी पल्लवी हिस भांडण करुन माहेरी डोंगरगाव येथे आणून सोडलेने सध्या ती माहेरी आहे.
दि.१६ जुलै सायंकाळी ५ च्या दरम्यान वरील आरोपीने विना नंबरच्या मोटर सायकलवर डोंगरगाव येथे फिर्यादीच्या घरी येवून फिर्यादीस आवाज दिला.
तद्नंतर फिर्यादी व दोन मुले घराबाहेर आले. आरोपी पतीने फिर्यादीस तुला आपल्या घरी यायचे आहे की इथेच राहयचे आहे? असे मोठमोठ्याने ओरडू लागला. त्यावेळी फिर्यादीने मला आत्ताच यायचे नाही असे सांगितले. यावर आरोपीने रागाला येवून शिवीगाळी सुरु केली.
फिर्यादीने शिवीगाळी करु नका असे म्हणत असताना आरोपीने काठीने फिर्यादीच्या वडिलाच्या पायावर भाऊ नामदेव यास लाथाबुक्क्याने फिर्यादीच्या पोटात, पाठीत मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून
या दरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटून गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. फिर्यादीच्या पतीने तुला यायचे नसेल तर येवू नको, मुलांना घेवून जातो असे म्हणून
दोन मुलांना सोबत घेवून गेले व जाता जाता तू तक्रार दिलीस तर तुला जीवंत सोडणार नाही असे धमकी दिल्याचे म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज