टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील आवताडे शुगर कारखान्याच्या आवारातील ५ लाख ९४ हजार ७२० रूपये किंमतीचे साखर कारखान्यास लागणारे साहित्य चोरून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रानी दिलेली माहिती अशी, दि.१३ जुलै रोजी रात्री १२.३० च्या दरम्यान आवताडे शुगर कारखान्याच्या आवारातील डब्ल्यू टी पी प्लँटजवळील बंद असलेल्या
स्टोअर रूमचे शटर उचकटून व खिडकीचे लोखंड गज तोडून चोरटयाने आत प्रवेश करून साखर कारखान्यास लागणारे
५ लाख ९४ हजार ७२० रूपये किंमतीचे ६०० किलो वजनाचे साहित्य चोरून नेली असल्याची फिर्याद सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड यांनी पोलिसात दिल्यावर अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान चोरीच्या घटनेत दिवसें दिवस वाढ होत असून आता चोरटयाने आपले लक्ष साखर कारखान्यांनाही केले असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
यापुर्वी शहरात अनेक घरफोड्या तसेच मोटरसायकली चोरी करण्याचे प्रकार घडले होते. याचा तपास अद्यापही लागला नसताना साखर कारखान्यातील चोरी करून चोरटयानी पोलिसांना तपासाचे एक आव्हानच केले असल्याची खमंग चर्चा सुरू आहे.
हा विद्यमान लोकप्रतिनिधीचा साखर कारखाना असल्याने डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड तसेच नव्याने आलेले पोलिस निरीक्षक चोरट्याचा शोध घेण्यात कितपत यशस्वी होतात याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज