टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सर्व उमेदवारांसाठी आज मतदान पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटाने
खबरदारी म्हणून आपपल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांना मतदान कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचे याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?
विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
हे’ उमेदवार रिंगणात
भाजपाचे उमेदवार : पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत
शिवसेना (एकनाथ शिंदे ) : भावना गवळी, कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष : जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिलिंद नार्वेकर
पक्षीय बलाबल काय?
महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे. प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे.
तर महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. विधानपरिषदेच्या 11 सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपणार आहे, त्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होत आहे.
महायुतीचे संख्याबळ किती?
संख्याबळ – 200
उमेदवार – 9
कोटा – 23
एकूण मतांची गरज – 207
कमी असलेली मतं – 07
महाविकासआघाडीचे संख्याबळ किती?
संख्याबळ – 69
उमेदवार – 3
कोटा – 23
एकूण मतांची गरज – 69
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज