टीम मंगळवेढा टाईम्स ।
खातेदारांची रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या आर्थिक फायदा करिता वापरून, बनावट एफडी पावती देऊन अन्य साथीदारांच्या मदतीने
युनियन बँकेची १ कोटी २८ लाख २७ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाळवणी (ता. पंढरपूर) येथील युनियन बँकेतील तात्पुरत्या स्वरूपातील एका कर्मचाऱ्याने तो त्या गावचा रहिवासी असल्याने लोकांच्या, तसेच बँकेचे काम करत असताना,
तेथील स्टाफचा विश्वास निर्माण केला. त्यानंतर त्याने १२ मे २०२३ ते २१ जून २०२४ रोजी पर्यंत वेळोवेळी खातेदारांची रक्कम ट्रान्सफर करण्याचा कोणताही अर्ज नसतानाही केवळ त्यांचे आयडी वापरून,
तसेच अप्रामाणिकपणे खातेदारांची रक्कम इतरांच्या बँक खात्यांवर वळवून ती पुन्हा स्वतःच्या खाते क्रमांक ४७१८०२०१००४९२४९ या खात्यावर व अन्य खात्यावर घेतली,
तसेच काही खातेदारांकडून रोख स्वरूपात बँकेत एफडी करतो, म्हणून रक्कम घेऊन ती रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या आर्थिक फायदा करिता वापरली,
तसेच त्याची बनावट एफडी पावती देऊन अन्य साथीदारांच्या मदतीने युनियन बँकेची १ कोटी २८ लाख २७ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
याप्रकरणी फिर्यादी युवराज घनशाम देवमुंडे यांच्या तक्रारीवरून प्रसाद विनायक महाजन (वय २३, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि. शिरीष हुंबे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज