टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका ग्रामीण भागात एका किराणा दुकानाच्या पाठीमागे काही लोक गोलाकार बसून 52 पत्त्यांच्या पानावर तिरट नावाचा जुगार खेळत असलेल्या जुगार अड्डयावर
पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 31 हजार 140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून रितेश आण्णा मोरे(वय 24),संजय आप्पा मस्के(वय 30),अमोल आबा मोरे(वय 36),राघाप्पा बाबू पुजारी(वय 40),अमर गोरख गायकवाड(वय 34),दत्तात्रय गिरजाप्पा मस्के (वय 35),
दत्तात्रय नेमीनाथ गायकवाड(वय 40),संतोष रामा खिलारे(वय 40 रा.ढवळस),शिवाजी बाबू देवकुळे (रा.चडचण) या 9 जणांविरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.27 रोजी रात्री 11.00 वा.ढवळस ते जुना मंगळवेढा रोड लगत असणारे एका किराणा दुकानाचे पाठीमागील बाजूस 52 पानाच्या पत्त्यावर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिस प्रशासनास मिळताच
पोलिसांनी सदर ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता काही इसम गोलाकार बसलेले दिसले. तसेच पोलिसांची चाहूल लागताच काहींनी सुसाट वार्याच्या वेगाने पळ काढला मात्र ते पोलिसांच्या तावडीतून सुटू शकले नाहीत.
जुगार ठिकाणी रोख 11 हजार 140 रुपये रोख तसेच विविध कंपन्यांच्या चार मोटर सायकली असा एकूण 2 लाख 31 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या पुर्वीही मंगळवेढयात दोन ठिकाणी पंढरपूरचे प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकार्यांनी जुगार अड्डयावर धाडी टाकल्यानंतर काही दिवस जुगार अड्डे बंद झाले होते. मात्र अवैध धंदयाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे.
पोलिस प्रशासनाला वेळीच आळा घालावा अन्यथा भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज