टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील चक्क पोलीस पाटीलच कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना किंवा वैद्यकीय शिक्षण ही नसताना सध्या त्याने बोगस सेवा करण्यास चांगलाच जोर धरला आहे.
त्याला काही वैद्यकीय अनुभव नाही तरीही पैसे कमवण्याच्या हेतूने तो गरिबांच्या जीवाशी खेळ खेळत आहे स्वतःच्या घरामध्ये विविध प्रकारच्या गोळ्या , इंजेक्शन आहेत व डोणज गावामध्ये बोगस दवाखाना सुद्धा आहे.
त्यामुळे तो ग्रामीण भागातील गरीब लोकांना डिशीळ चे इंजेक्शन व गोळ्या देऊन त्यांची लूट करीत आहे त्यामुळे त्यांच्या किडनी फेल होण्याचा धोकाही वाढत आहे.
ही ग्रामीण भागातील त्याची दुकानदारी कधी बंद होणार याचीही सर्वत्र चर्चा सुरू आहे पण या बोगस डॉक्टर च्या विरोधात कोणीही विरोधात पाऊल उचलत नाही कारण तो जो विरोधात जाईल त्याला राजकीय पूर्ण दबाव टाकत आहे.
तो बोगस डॉक्टर डोणज व बालाजी नगर गावातील राजकीय पुढाऱ्यांना जवळ करून गरिबांची लूट करीत आहे.
या विरोधात बालाजी नगर येथील युवक एकत्र आलेत याची तक्रार वैद्यकीय अधिकारी सोलापूर ,ग्रामीण आरोग्य अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे युवकांनी तक्रार केली आहेत हा पोलिस पाटील गावातील कोणाची भांडण झाले तर त्यांच्या कडे पैशाची मागणी करतो
व गावातील अवैध धंदे वाल्यांना हप्ता मागतो त्यामुळे हा पोलिस पाटील नको म्हणून गावातील नागरिक म्हणत आहेत जर या व्यक्तीवर कारवाई नाही झाली तर या विरोधात प्रहार संघटने कडून आंदोलन करण्यात येईल असे प्रहारचे संजय राठोड यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज