टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातून सगळा गाळ काढला तरी सरकारला 9 हजार कोटी रुपये मिळतील, त्याशिवाय धरणातील 11 टीएमसी पाणी साठवण वाढेल. पण त्यासाठी सरकारला गाळ काढण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागले.
उजनी धरणात 10 कोटी 60 लाख ब्रास गाळ आहे, तो काढण्यासाठी सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागेल.
उजनी धरणाने तिची नीचांकी पातळी गाठल्याने जलाशय बऱ्याच ठिकाणी कोरडा पडला असून शासनाने गाळ काढण्याबाबत तातडीने निर्णय घेतल्यास लाखो रुपयांची वाळू देखील मिळू शकणार आहे.
उजनी धरणाचे बांधकाम 1969 साली सुरु होऊन जून 1980 साली यात पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. गेल्या 44 वर्षात धरण आणि त्याच्या
जलाशयात तब्बल 10.64 टीएमसी म्हणजे तब्बल 10 कोटी 60 लाख ब्रास एवढा गाळ साठल्याचा अहवाल शासनाने नेमलेल्या गाळ निश्काशन प्रारूप निविदा समितीने 22 मे 2023 रोजी दिला होता.
यानंतर शासनाने सर्व क्षेत्रीय कार्यालयाकांडून अभिप्राय मागवला असून अजून हा अभिप्राय प्राप्त न झाल्याने उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय होऊ शकला नसल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.
धरणातील गाळ काढण्याचे काम 10 वर्ष कालावधीचे असणार असून ज्या ज्या वेळी पाणी कमी होईल त्यावेळेत हा गाळ काढता येणार आहे. उजनीचे बुडीत क्षेत्र 30 हजार हेक्टर असून नाशिकच्या मेरी या शासनाच्या संस्थेने केलेल्या तपासणीनुसार उजनी धरणात 10.64 टीएमसी एवढा गाळ आहे.
यामध्ये मृत साठ्यात 3.99 टीएमसी तर उपयुक्त साठ्यात 6.65 टीएमसी एवढा गाळ आहे. हा गाळ काढल्यानंतर आता कागदावर दिसणारे 10.64 टीएमसी एवढे खरे पाणी यात साठणार असून याचा मोठा फायदा दुष्काळी परिस्थितीत करता येऊ शकणार आहे.
उजनी धरणातून निघणारा गाळ हा शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार असून गाळातील वाळू वेगळी करून तिच्या विक्रीतून मोठा महसूल शासनाला मिळू शकणार आहे.
यासाठी ठिकठिकाणच्या गाळाचे सँपलं घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. उजनी धरणाच्या गाळात कमीतकमी २० ते ३० टक्के एवढे वाळूचे प्रमाण असून यातून किमान 2.23 कोटी ब्रास वाळू मिळणार आहे. ज्याची बाजारभावानुसार किंमत 9 हजर कोटी इतकी होते.
शासनाने तातडीने उजनी मधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यामुळे कागदावरचे पाणी धरणात जमा होऊन याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो . हे पाणी धरणात साठण्यास सुरुवात झाल्यावर किमान 1 लाख हेक्टर जमिनीला पाणी देता येणार आहे.(स्रोत:ABP माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज