मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मृत्यूच्या आधी काही क्षण तुमच्या डोळ्यासमोर एक लख्ख प्रकाश पडतो, जो तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतो असं म्हणतात, पण खरंच असं होतं का ? वैज्ञानिकांनी अशा अनेक लोकांच्या अनुभवांबाबत रिसर्च केला आहे.
हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो, पण मृत्यूच्या काही मिनिटांनंतर ती व्यक्ती पुन्हा जिवंत होते, अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. याचं अचूक कारण अजूनही वैज्ञानिकांना मिळालेलं नाही. आता एका महिलेने मृत्यू झाल्यानंतर 24 मिनिटांनी आपण जिवंत झाल्याचा दावा केला आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार लॉरेन कॅनाडे नावाच्या महिलेने सोशल मीडिया साईट रेडिटवर तिची कहाणी सांगितली आहे. मागच्या फेब्रुवारी महिन्यात घरात असताना मला कार्डियक अरेस्ट आला. माझ्या नवऱ्याने 911 क्रमांकावर फोन केला आणि सीपीआर द्यायला सुरूवात केली. डॉक्टर आले आणि त्यांनी माझा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
पण 24 मिनिटांनंतर मी पुन्हा जिवंत झाले आणि मला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. एमआरआयमध्ये मेंदूचे कोणतेही नुकसान झालेले नाही हे पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटले, असं ही महिला म्हणाली.
‘त्यावेळी माझ्यासोबत काय घडले ते मला स्पष्टपणे आठवतं. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर, माझ्या पतीने मला चार मिनिटे सीपीआर दिलं. त्यांनी 911 नंबरवर कॉल केला, तिथून डॉक्टर त्यांना अशा परिस्थितीत काय करावं हे समजावून सांगत होते. काही वेळाने आपत्कालीन सेवाही आली.
24 मिनिटांनंतर माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं, त्यानंतर मला दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, मी कोमात गेले होते. 2 दिवस मी कोमात राहिले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी खूप गोंधळले होते. बरेच दिवस जुन्या गोष्टी आठवत नव्हत्या. ICU मध्ये माझं काय झाले ते मला माहीत नाही.
शेवटच्या क्षणांमध्ये काय झालं?
जेव्हा माझ्या शरीरात जीव नव्हता, तेव्हा मला आठवतं की मला खूप शांत वाटत होतं. कोमातून बाहेर आल्यानंतर काही आठवडे ही शांतता माझ्यात राहिली. मी दिवस आणि वेळ विसरले होते. मी प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाही. मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते ते मी विसरले. लॉरेनने त्यांचा मृत्यू झाला त्या वेळेबद्दल सांगितले. त्या म्हणाला, मला कोणताही प्रकाश किंवा बोगदा दिसला नाही,
परंतू मला शांततेची भावना जाणवली. मला माझ्या ऑफिसमध्ये पडल्यासारखं वाटत होतं. हे विचित्र आहे, परंतु पूर्णपणे सत्य आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मला मृत्यूची भीती वाटत नाही, असा थरारक अनुभव लॉरेन यांनी सांगितला.(स्रोत; News 18 लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज