mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणाला मिळाली संधी ते जाणून घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 30, 2024
in राष्ट्रीय
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स ।

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्डकप खेळणार आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2024/04/VID-20240429-WA0043.mp4

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्ये कोणते खेळाडू खेळणार आणि कोण नाही? याची बरीच चर्चा रंगली होती. आता या सर्व चर्चांवर पडदा पडला आहे. बीसीसीआयने डेडलाईनच्या एक दिवस आधी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर भारताने टीमची घोषणा केली आहे. उपकर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात की ऋषभ पंतच्या यावरून चर्चा रंगली होती. मात्र यावरही आता पडदा पडला आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे.

तर संजू सॅमसनची निवडही संघात झाली आहे. शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद आणि आवेश खान यांना राखीव खेळाडू म्हणून घोषित केलं आहे. एका अर्थाने या खेळाडूंना संघात एखादा खेळाडू जखमी झाला तरच संधी मिळू शकते. तर केएल राहुल याचा पत्ता वर्ल्डकप संघातून कापला आहे.

फलंदाजीची धुरा रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन यांच्या खांद्यावर असेल. हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका बजावतील. कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्या खांद्यावर फिरकीपटूची जबाबदारी असेल.

अर्शदी सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. युझवेंद्र चहलची संघात निवड झाली असून कारकिर्दित पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. चहलने आयपीएल 2024 स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली असून पर्पल कॅपच्या शर्यतीत कायम असल्याचं दिसून आला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होईल. मात्र भारतीय वेळेनुसार स्पर्धा 2 जूनपासून सुरु होईल. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडसोबत आहेत.भारताचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला आहेत. ही स्पर्धा 29 जूनपर्यंत असणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघांनी सहभाग घेतला आहे. चार गटात या संघांची विभागणी करण्यात आली आहे. भारताच अ गटात असून या गटात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. गेल्या 11 वर्षांपासून आयसीसी चषकांपासून टीम इंडिया वंचित आहे. शेवटचा आयसीसी चषक महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात 2013 मध्ये जिंकला होता. त्यानंतर 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकण्याची संधी होती. मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. आता पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करावं अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टी-20 वर्ड कप

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

August 16, 2025
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोनेप्रेमींचे टेन्शन वाढणार! दागिने खरेदी करायचंय? मग आत्ताच करा; भविष्यातील संकेत पाहूनच धडकी भरेल…

August 15, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

बापरे..! संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून…

August 15, 2025
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पिक्चर अभी बाकी है..! व्होट चोरीवरुन राहुल गांधींचा भाजपला इशारा; गांधींच्या प्लॅनने वाढवलं भाजपचं टेन्शन?

August 13, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामगिरी! भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचे सांगितले आकडे…

August 14, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकही रुपया खर्च न करता मिळणार वर्षाला 36 हजार पेन्शन; कुठे कराल नोंदणी? कोणते शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र आहेत?

August 10, 2025
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आता मोठा निर्णय; राष्ट्रगीतानंतर ‘हे’ गाणं बंधनकारक करण्यात आलं

August 7, 2025
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Shocking News! विद्यार्थ्याला शिक्षा करणं भोवलं; शिक्षकाला तब्बल १ लाख रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास; नेमकं काय घडलं?

July 27, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; शेतकऱ्यांना होणार लाभ: पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?

July 17, 2025
Next Post
विजय निश्चित! धैर्यशील मोहिते पाटील जिंकणारचं; आम्ही फलटणमधून जास्तीत जास्त मताधिक्य देणार; अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी दिला शब्द

विजय निश्चित! धैर्यशील मोहिते पाटील जिंकणारचं; आम्ही फलटणमधून जास्तीत जास्त मताधिक्य देणार; अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी दिला शब्द

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा ‘एवढे’ हजार रुपये; शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना; जाणून घ्या काय आहे योजना?

August 26, 2025
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; सोलापूर जिल्हा बंद ? बाबत नवी घोषणा

मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी

August 26, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाचा मोठा विजय; मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारची घोषणा

August 26, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा