टीम मंगळवेढा टाईम्स ।
धाराशिवच्या तूरोरी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बावीस वर्षीय तरुणाने गुरुवारी, (दि. २८) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जीवन संपवले. कृष्णा सतिश जाधव (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दरम्यान तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हा दूसरा बळी गेल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनानंतर मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीवरून अधिक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.
मात्र, असे असतांना काही तरुण नैराश्यातून थेट जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.
धक्कादायक म्हणजे उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील कृष्णा सतिश जाधव (वय २२) या तरुणाने गुरूवारी सायंकाळी चूलत्याचा पडक्या घरच्या लाकडी सराला नायलनचा दोरीने गळफास लावून आपले जीवन संपविले.
जीवन संपवण्यापूर्वी लिहीलेल्या चिठीतून मृत्यूचे कारण उघड झाले आहे. याची माहिती मिळताच पोलीस पाटील प्रशांत पाटील यांनी उमरगा पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकारचा पोलीस अधिक तपास करत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली होत आहे.
कृष्णा जाधव हा मराठा आरक्षण अंदोलनात सुरवातीपासून सक्रिय होता. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कायम समाज माध्यमात वेगवेगळ्या पोस्ट करायचा,
उमरगा शहरात मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कृष्णा जाधव याच्या नेतृत्वाखाली तुरोरी ते उमरगा आठ किमी मोठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती.
चिठ्ठीतील मजुकूर!
‘एक मराठा लाख मराठा’ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नसल्याने माझे जीवन संपवत आहे. कृष्णा जाधव असे निळ्या शाईच्या पेनने लिहलेली मजुकुराची चिट्टी पँटच्या खिशातून पोलिसांनी जप्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज