mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन तासांच्या चौकशीनंतर अटक, ईडीनं घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 21, 2024
in राष्ट्रीय
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन तासांच्या चौकशीनंतर अटक, ईडीनं घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. कथित दारु घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे.

उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या घराची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची दोन तासांपेक्षाही अधिककाळ चौकशी करण्यात आली.

केजरीवाल यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून त्यांना दहाव्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने याच प्रकरणात केजरीवालांना दिलासा द्यायला नकार दिल्यानंतर सायंकाळी ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी जाऊन धडकले. केजरीवाल यांच्या उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ‘ईडी’च्या पथकात सात ते आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यात सह संचालक कपिल राज तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंगल्याच्या परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कार्यकर्ते, नेते जमले
‘ईडी’चे पथक केजरीवालांच्या घरी पोहोचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर ‘आप’ चे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले होते. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांना अटक करण्याच्या हेतूने ‘ईडी’चे पथक आले असल्याचा आरोप केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर समाजमाध्यमांतून टीका केली.

त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला असून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी ट्विट करुन अरविंद केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचं सांगितलं. ”सर्वोच्च न्यायालयाने आज रात्रीच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आम्ही केली आहे.” असं त्या म्हणाल्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अरविंद केजरीवाल

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
मोठी बातमी! न्यायालयीन कर्मचाऱ्यासह साक्षीदारास वकिलाने केली मारहाण; शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील 'त्या' दोघांचे जामीन अर्ज फेटाळले

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा