mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! सोलापूरसाठी भाजपकडून ‘हे’ नाव जवळपास निश्चित?; ताकदीची लढत पाहायला मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 17, 2024
in राज्य, सोलापूर
सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न? ईदगाहच्या समोर ‘लव्ह पाकिस्तान’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री; नेमकं काय घडलं?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

नुकतेच भाजपची दुसरी यादी जाहीर झाली त्यामध्ये माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन भाजपने स्थानिक इच्छुकांची तोंड बंद केली.

विरोधात बोलण्यास कुणालाही पर्याय उरला नाही त्यामुळे आता सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात ही तसाच तगडा, त्या लेव्हलचा, आक्रमक बोलणारा उमेदवार सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तो उमेदवार म्हणजे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव ऐकण्यास मिळते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मात्र व्यवसायात मुंबईमध्ये राहणारे एडवोकेट शरद बनसोडे यांना दीड लाखाच्या मताधिक्याने सोलापूरकरांनी निवडून दिले. बनसोडे आपल्या कामापेक्षा आपल्या इतर सवयींमुळेच चर्चेत राहिले.

त्यामुळे भाजपची बदनामी झाली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तयार झालेले वातावरण पाहता भाजपने भगवेदारी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देऊन एक लाख 58 हजाराच्या मताधिक्याने विजयी केले.

परंतु या पाच वर्षात महाराजांना अपेक्षित काम करता आले नाही. विकासाचा मोठा प्रकल्प त्यांना आणता आला नाही ते बोलण्यात कमी पडले तसेच त्यांच्या बनावट जातीच्या दाखल्यामुळे भाजपची प्रचंड बदनामी झाली.

त्यामुळेच यंदा भाजपने स्थानिक आणि अनुसूचित जातीचा ओरिजनल उमेदवार द्यावा अशा मागणीने जोर धरला. त्यामुळे सोलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे अनेक अनुसूचित जातीचा कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

परंतु काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या स्वतः मैदानात उतरल्याने त्यांच्या तोडीस तोड उमेदवार या इच्छुक कार्यकर्त्यांमधून दिसत नाही.

आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मागील तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्या थेट मतदारांच्या संपर्कात असतात. मतदारांचे प्रत्येक प्रश्न ते विधानसभेत मांडतात.

महिला आणि युवकांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. महिला म्हणून ही त्या आक्रमक आहेत. अशावेळी भाजपकडून प्रणिती शिंदे यांना आव्हान देणारा त्याच ताकतीचा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे.

माळशिरसचे आमदार राम सातपुते हे सुद्धा आक्रमक वक्तृत्व शैलीचे नेते आहेत. विधानसभेत प्रत्येक प्रश्न ते तळमळीने मांडतात. ते माळशिरसचे आमदार असतानाही त्यांनी सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चा प्रश्न विधानसभा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता.

मतदार संघात गावोगावी फिरून नागरिकांचे प्रश्न जाणून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जरी ते इतर जिल्ह्यातले असले तरी मागील पाच वर्षात त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपली चांगले ओळख निर्माण केली आहे.

भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यातील लढत तितक्याच ताकतीची पाहायला मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर लोकसभा निवडणूक

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
Next Post
राजकाऱ्यांनो! निवडणूकीत वार्तांकन करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करू; मंगळवेढ्यात पत्रकारांनी घेतली ‘ही’ शपथ

राजकाऱ्यांनो! निवडणूकीत वार्तांकन करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करू; मंगळवेढ्यात पत्रकारांनी घेतली 'ही' शपथ

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा