टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील कृषी भूषण अंकुश राजाराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरुन पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी देत जबर मारहाण केल्या प्रकरणी
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीकडून एक पिस्तूल व दोन तलवारी जप्त करत तीन आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
सदरची घटना दि.6 मार्च रोजी रात्री 8.30 च्या सुमारास जुनोनी शिवारात घडली.याप्रकरणी अंकुश शिवाजी इटकर, रवि शिवाजी इटकर, करण शंकर इटकर (सर्व रा.लक्ष्मीदहिवडी ता.मंगळवेढा),
अतुल इटकर, सुमित जाधव,आकाश इटकर, रा.सध्या पंढरपुर व इतर 2 ते 3 इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी अंकुश पडवळे व त्यांचा पुतण्या संग्राम सिताराम पडवळे व भाऊ किसन राजाराम पडवळे असे जुनोनी तलावातील गाळ (माती) काढुन फिर्यादीच्या शेतामध्ये घालण्याकरीता घेवुन जात असताना
आकाश इटकर, अंकुश इटकर, रवि इटकर, करण इटकर, अतुल इटकर, सुमित जाधव व इतर 2 ते 3 लोकांनी दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबी च्या चाव्या काढुन घेवुन येथील गाळ काढायचा नाही
या करणावरुन हातात तलवारी घेवुन गैरकायद्याची मंडळी जमवुन आकाश किसन इटकर याने फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवुन जिवच मारतो अशी धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.
मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, तीन आरोपीकडून दोन तलवारी सह एक पिस्तूल जप्त करण्यात यश आले.
इतर आरोपींचा शोध सुरू असून ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे, पो. कॉ. हजरत पठाण,पो. कॉ. राजू आवटे, सुरज देशमुख यांच्या पथकाने केले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज