टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात येईल. तरीही पाणी चोरी केली तर मोटार जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
सीना नदीकाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
सीना नदीत पाणी राहण्यासाठी नदीकाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. चाराटंचाईवर मात करण्यासाठी तपासणी सुरू होणार आहे, यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, नगर विकास विभागाच्या प्रमुख वीणा पवार उपस्थित होते.
पाण्याची स्थिती अशी
उजनी धरण – १७.१७%
मध्यम प्रकल्प- ७.७२%
लघु प्रकल्प – ३.४१ %
बंधारे ९.०३%
उजनीची स्थिती गंभीर
उजनी धरणात यंदा उच्चांकी पाण्याचे नीचांक जाणार आहे. वजा ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जाईल. उजनीच्या बॅक वॉटरमधील पाण्याचा उपसा थांबवण्यासाठी
अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित करावा लागेल. उजनीत पुणे जिल्ह्यातील पाणी येणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज