टीम मंगळवेढा टाईम्स ।
माहिती अधिकाराच्या – अर्जावर गोल शिक्का मारुन दुय्यम प्रत दिल्यावर आडवा शिक्का मारा असे म्हणत एका ३८ वर्षीय ग्रामसेविकेच्या हातातील कागद फाडून
उजव्या – खांदयाला हात लावून लज्जा वाटेल असे कृत्य – केल्याप्रकरणी गिरीश निगोंडा पाटील याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ही ग्रामसेविका म्हणून कार्यरत असून दि.५ – रोजी १२.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात फिर्यादी शासकीय कामकाज करीत असताना वरील आरोपीने येवून माहिती अधिकाराचा अर्ज दिला.
तो अर्ज फिर्यादीने स्विकारुन त्यावर दिनांकासहीत सही करुन कार्यालयाचा गोल शिक्का मारुन त्याच्याकडे दुय्यम प्रत दिली असता आरोपीने त्यावर आडवा शिक्का मारा असे म्हणाल्यावर फिर्यादीने थोडे थांबा शिक्का मारुन देते असे म्हणताच
आरोपीने फिर्यादीला अरेरावीची भाषा वापरुन फिर्यादीच्या हातातील शासकीय कागद फाडून टेबलावर टाकून फिर्यादीच्या उजव्या खांदयाला हात लावून दाबून तिला लज्जा वाटेल असे कृत्य करुन फिर्यादीस ढकलून देवून शासकीय कामात अडथळा आणून
शासकीय काम रोखले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. भा.दं.वि. कलम ३५३,३५४,३५४(अ), ३२३ प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज