टीम मंगळवेढा टाइम्स ।
सोलापूर-तुळजापूर रोडवर १३ जानेवारी रोजी १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह जोडभावी पेठ पोलिसांना आढळला होता. त्यावेळी आकस्मित मयत म्हणून पोलिसांत नोंद झाली.
पण, पोटच्या मुलाचा जन्मदात्या बापानेच खून केल्याची बाब आता प्राथमिक तपासात समोर आली आहे. विजय बट्टू असे त्या संशयिताचे नाव आहे.
रविवारी सकाळी घरातील सदस्यांशी भांडताना संशयित आरोपी विजय बट्टू याने मुलाला स्वत: मारल्याचे उडतउडत सांगितले. त्यानंतर पत्नीने पोलिसात धाव घेतली व पोलिसांना त्यासंबंधीची माहिती दिली. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत काही तास कसून चौकशी केली.
सुरवातीला तो उडवाउडवीची माहिती देत वेगवेगळे सांगत होता. पण, पोलिस निरीक्षक अजय जगताप यांनी केलेल्या चौकशीतून बरीच माहिती समोर आली. पोलिसांनी संशयित आरोपी विजय बट्टू याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोटच्या मुलाला विष देऊन का मारले, ही बाब अजून स्पष्टपणे समोर आलेली नाही. पुढील चौकशीत नेमकी माहिती समोर येईल, असे पोलिस सूत्रांनी बोलताना सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज