टीम मंगळवेढा टाईम्स ।
गावोगावी सुरू असलेल्या अंगणवड्या म्हणजे चिमूरड्यांचे हक्काचे खेळण्याचे, शिकण्याचे व भरपेट खाण्याचे ठिकाण. गावासह अगदी वाडी-वस्तीवरही अंगणवाडी सुरू आहेत.
याच अंगांवडीत काम करण्याऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
एकात्मिक बाल विकास सेवेतील 13 हजार 11 मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येकी एक मदतनीस म्हणजे 13 हजार 11 पदांची भरती या निर्णयामुळे होणार आहे.
तसेच प्रत्येक 25 अंगणवाडी केंद्रासाठी 1 मुख्यसेविका आणि पर्यवेक्षक अशा पद्धतीने 520 पदांची भरती पान केली जाणार आहे. एकूणच यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. याद्वारे राज्यात तब्बल 13 हजार 531 पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
हा श्रेणीवर्धन आणि नव्याने पदाची भरती करण्याचा निर्णय घेतानाच मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च आणि औषधोपचार खर्च असेही सहाय्य केले जाणार आहे.
त्यासाठी तब्बल 116 कोटी 42 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी कधी आणि केंव्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज