टीम मंगळवेढा टाईम्स ।
तालुका पंचायत समिती गुण नियंत्रण तथा कृषी अधिकारी विनायक तवटे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारला कंटाळून खते, औषधे बी-बियाणे दुकानदारानी बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आमदार समाधान आवताडे यांना दिले आहे.
मंगळवेढा तालुका रासायनिक खते, बी-बियाणे, औषधे विक्रेते संघटनेच्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, मंगळवेढा तालुका पंचायत समितीअंतर्गत जो गुण नियंत्रण (कृषी) विभाग येतो त्या
गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विनायक तवटे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारला कंटाळून सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद करण्याचा निश्चय केला असून
गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विनायक तवटे हे कृषी दुकानदारांना व संबंधित कंपन्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांचा नमुना तपासणीच्या नावाखाली कायद्याचा धाक दाखवून आर्थिक व मानसिक पिळवणूक करीत आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील विक्रेता कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठा उत्पादित करीत नाही. सर्व विक्रेते राज्याच्या कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपन्यांकडून बियाणे, खते व कीटकनाशके सिलबंद खरेदी करून त्याच पद्धतीने शेतकऱ्यांस विक्री करतात.
राज्य शासनाच्या सुधारित नव्या जुन्या कायद्याचा धाक दाखवून दुकानदारांना व कंपन्यांना ब्लॅकमेल करून आर्थिक मागणी केली जाते. ती पूर्ण नाही केली की गुन्हे दाखल करू, असे धमकावले जाते.
अशा त्रासाला कंटाळून तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी दुकाने बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अधिकाऱ्याची एक तर बदली करावी अन्यथा कार्यभार काढून दुसऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याला द्यावा अशी मागणी केली आहे.
या वेळी तालुका रासायनिक खते बी बियाणे कीटकनाशक विक्रेते संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत, सचिव येताळा भगत यांच्यासह चंद्रशेखर कोंडूभैरी, नंदू मोहिते, मारुती जाधव, अशोक लोहकरे, धनाजी बिचुकले, वेताळा मुरडे, संजय कट्टे, प्रदीप खांडेकर, विशाल खटकाळे, ढगे, विजय भोसले, समाधान घुले आदी उपस्थित होते.
माझी तब्येत बरी नाही, दोन दिवसांनी प्रतिक्रिया देतो
माझी तब्येत बरी नाही. दोन दिवसांनी या विषयी प्रतिक्रिया देतो, असे पंचायत समितीचे कृषी अधिकारी विनायक तवटे यांनी प्रतिक्रयेसाठी संपर्क साधला असता सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज