टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करण्यात आले असून आज मंगळवारी एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मंगळवेढा तालुका यांचे मार्फत आज दि.28 जुलै रोजी निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) असणाऱ्या 03 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.या व्यक्तींमध्ये मंगळवेढा या गावातील नागरीकांचा समावेश आहे.
तसेच आज दि.28 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 106 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 106 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 105 जणांचे अहवाल निगेटिव्ह आणि 01 जणांचा पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे.
सदर व्यक्ती सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे 32 अहवाल प्राप्त झाले असुन ते सर्व 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 97 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 21 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे.तर आज पर्यंत 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
वरील स्वब घेतलेल्या आणि पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) आणि कमी संपर्कातील ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरू करणेत आलेले आहे.
वैदयकीय विभागामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करणेत आलेल्या असून आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज