टीम मंगळवेढा टाईम्स।
अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने अल्पसंख्यांक बहुल योजना राबवली आहे.
त्या योजनेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये या योजनेतून विविध विकास कामासाठी १ कोटी १० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथे दफनभूमी मध्ये वेटिंग सीड व पेविंग ब्लॉक बसवणे १० लाख रुपये,तांडोर सिद्धापूर रस्त्यावर मुस्लिम गल्लीकडे व मदरसा कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, लवंगी येथील मुस्लिम गल्लीमध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसवणे १० लाख,
नंदुर येथे मस्जिद समोर सभागृह बांधणे ८ लाख,कात्राळ येथील मस्जिद समोर पेविंग ब्लॉक बसवणे ५ लाख, हुलजंती येथील मुस्लिम मस्जिद समोर सभागृह बांधणे १० लाख, आंधळगाव येथील गैबी साहेब देवस्थान समोर सभागृह बांधणे ७ लाख, पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथे पीर साहेब दर्ग्यासमोर सभागृह बांधणे 15 लाख,
कोर्टी येथील मदिना मस्जिद समोर शादी खाना बांधणे २० लाख, तावशी येथे लाडले मशाक समोर शादीखाना बांधणे 15 लाख अशी एकूण एक कोटी दहा लाख रुपये मुस्लिम बहुल वस्त्यांचा विकासासाठी मंजूर झाला असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.
अभ्यासू व चाणक्य बुद्धिमत्तेवर मतदार संघामध्ये हजारो कोटींचा निधी आला
अनेकांना ज्या योजना माहिती नाहीत त्या योजने मधून आमदार समाधान अवताडे यांनी प्रत्येक ठिकाणी निधी दिला आहे त्यांच्या अभ्यासू व चाणक्य बुद्धिमत्तेवर मंगळवेढा पंढरपूर मतदार संघामध्ये हजारो कोटींचा निधी आला असून विकास काय असतो हे त्यांच्या कामातून दिसून येत आहे.- आयुब शेख कोर्टी पंढरपूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज