टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीणमध्ये मंगळवारी कोरोनाने 7 जणांचा बळी घेतला असून 148 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही.मृतांमध्ये दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट हे तालुके आघाडीवर आहेत. ( Solapur rural corona updated )
सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामधील 23 हजार 996 व्यक्तींची झाली कोरोना टेस्ट करण्यात आली असून आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले 3 हजार 120 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे व 1 हजार 744 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.
तर मंद्रूप येथील 75 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्यातील सासुरे येथील 71 वर्षीय पुरुष, सनगर गल्लीतील 65 वर्षीय महिला,पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील 40 वर्षीय महिला, बालाजी नगरातील 50 वर्षीय पुरुषाचा, करमाळ्यातील शेलगाव (क) येथील 40 वर्षीय महिला, दक्षिण सोलापुरातील वळसंग येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
‘या’ भागात आढळले रुग्ण
पंढरपुरातील अनिल नगर, बडवे गल्ली, चंद्रभागा घाट, गांधी रोड, इंदिरा गांधी मार्केट, जुना सोलापूर नाका, कदबे गल्ली, खवा बाजार, रामबाग रोड, सावता माळी मठ, भांटुबरे, फुलचिंचोली, नेपतगाव, तुंगत येथे प्रत्येकी एक, सिध्दीविनायक सोसायटीत तीन, बोहाळीत सहा, नारायण चिंचोलीत दोन रुग्ण आढळले. तर सांगोल्यातील बलवडी, निजामपूर, शिरभावी येथे प्रत्येकी एक, महूद येथे तीन, वझरे येथे पाच रुग्ण सापडले.
दक्षिण सोलापुरातील धोत्रीत सहा, कासेगावात चार आणि बार्शीतील अलिपूर रोड परिसरात सहा, भवानी पेठ, ढगे मळा येथे प्रत्येकी दोन, भिम नगर, कासारवाडी रोड, सासुरे, सिध्देश्वर नगरात प्रत्येकी एक, तर हळदुगे येथे सहा रुग्ण आज सापडले आहेत.
अक्कलकोटमधील बेडर गल्ली, दुधनी, मैंदर्गी, स्वामी समर्थ नगर, तडवळ येथे प्रत्येकी एक, म्हाडा कॉलनीत दोन, बुधवार पेठेत चार, करमाळ्यातील फंड गल्लीत एक, शेलगाव (क) मध्ये पाच, माढा तालुक्यातील रिधोरेत 17, उपळाई खु.मध्ये एक रुग्ण आढळला आहे.
उत्तर सोलापुरातील डोणगावात एक, हिरजेत चार, वडाळ्यात 19, माळशिरस तालुक्यातील अकलूज, लवंग, मांडवे, नातेपुते, वाफेगाव, यशवंत नगर येथे प्रत्येकी एक, मोहोळमधील रोहिदास नगरात तीन, साठे नगरात दोन, कामती बु.येथे सात, पापरीत दोन रुग्णांची भर पडली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज