टीम मंगळवेढा टाईम्स ।
धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.शोभाताई काळुंगे तर व्हा.चेअरमनपदी शांताबाई धायगोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सन 2023- 24 ते 2028- 29 या पंचवार्षिक निवडणुकीकरिता संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. असे पत्र शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्याकडून देण्यात आले.
त्यानुसार मंगळवार दि.७ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी मंगळवेढा तालुका सहाय्यक निबंधक पी.सी दुरगुडे हे होते.
संस्थेच्या नूतन संचालक मंडळांमधून चेअरमन पदासाठी शोभा शिवाजीराव काळुंगे यांचा एकच अर्ज प्राप्त झाला. सूचक म्हणून विद्या संजय जावीर व अनुमोदक म्हणून सुनीता दत्तात्रय नागणे यांनी अनुमोदन दिले.
तसेच व्हा.चेअरमन या पदासाठी शांताबाई श्रीशैल्य धायगोंडे यांचा एकच अर्ज प्राप्त झाला व यास सूचक म्हणून दिपाली योगेश पाटील व अनुमोदक म्हणून कल्पना ईश्वर गडदे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी पी.सी दुरगुडे यांनी चेअरमन पदासाठी शोभा काळुंगे व व्हा. चेअरमन पदासाठी शांताबाई धायगोंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडी जाहीर केल्या.
तसेच नूतन संचालक म्हणून दिपाली योगेश पाटील, सुनीता दत्तात्रय नागणे, संगीता किसन सावंजी, सुरेखा प्रभाकर कलूबर्मे, पूजा गणेश शिंदे, वेणूबाई कल्याण रोकडे, विद्या संजय जावीर, कल्पना ईश्वर गडदे, मनीषा ब्रह्मदेव कुंभार यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहिर केले.
याप्रसंगी नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, डॉ.राजलक्ष्मी काळुंगे – गायकवाड, शिवाजीराव पवार, किसन सावंजी, प्रभाकर कलूबर्मे, कल्याण रोकडे, ज्ञानदेव जावीर, ईश्वर गडदे,
उमाकांत कनशेट्टी, गणेश शिंदे, श्रीशैल्य धायगुंडे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार संस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज