टीम मंगळवेढा टाईम्स ।
आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.
राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी बारामतीत आले होते. यावेळी मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला.
अजित पवार यांची रविवारी बारामती तालुक्यातील पणदरे येथे जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर अजित पवार यांना मराठा समाजातील तरुणांनी घेराव घातला.
आरक्षण कधी देता ते सांगा असा सवाल करत मराठा तरुणांनी अजित पवार यांना आरक्षणाबाबत भूमिका विचारली.
यावेळी अजित पवार यांनी तरुणांना शांतपणे उत्तरे दिली. कोणत्याही समाजाला धक्का न लागता आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
आमच्या या संदर्भात बैठका होणार आहे. मराठा समाजातील १० पैकी ८ टक्के नागरिक हे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत आहेत, असंही अजित पवार म्हणाले.
आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. मी देखील मराठा समाजात जन्माला आलो आहे. तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही कधीही तयार आहोत. मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय, असं अजित पवार म्हणाले.
आमचा जो गरीब मराठा वर्ग आहे. ज्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही अशा लोकांना आरक्षण द्यावं, या मताचा मी आहे. पण कुणाच्या तरी तोंडातला घास काढून तो दुसऱ्याच्या तोंडात देणं बरं नाही. आरक्षणाची मागणी करणाऱ्यांबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही, असं अजित पवार म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज