टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथील जगदंबा मंदिर येथे आज दि.21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 8 यावेळेत दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ.प्रीती शिर्के यांनी दिली आहे.
श्री जगदंबा देवस्थान मंगळवेढा यांनी आयोजित केला असून यामध्ये सह आयोजक म्हणून सावली फौंडेशन, मंगळवेढा तसेच यामध्ये निमा वूमन फाउंडेशन, इनरव्हील क्लब व रत्नपारखी ज्वेलर्स संयोजक म्हणून असणार आहेत.
महिलांना दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस रत्नपारखी ज्वेलर्स दिले जाणार आहे तर दुतीय क्रमांकास 3 हजार रुपयांचे बक्षिस इनरव्हील क्लब यांच्याकडून दिले जाणार आहे.
त्याचबरोबर तृतीय क्रमांक बक्षीस दोन हजार रुपये रिलायन्स पेट्रोल पंप यांच्याकडून देण्यात येणार आहे.
दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांचा सत्कार देवस्थानचे खजिनदार डॉ.शरद शिर्के व अध्यक्ष संजय मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी ‘या‘ नंबरवर संपर्क साधा
ज्या महिलांना दांडिया स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी 8010303215, 7038504802, 9577070797 या नंबर वर संपर्क साधावा.
दरम्यान, उपस्थित महिलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे विजेत्या महिलेस आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज