mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 2, 2023
in मनोरंजन
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आशिया चषकात ज्या सामन्याची प्रतीक्षा क्रिकेटचाहते चातकाप्रमाणे करत होते, तो सुरु होण्यासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्या आज हा महामुकाबला रंगणार आहे.

दोन शेजारील देश आणि पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल. हा समाना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ती आश्चर्यचकित करणारी आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 17व्यांदा आमनेसामने येणार आहेत. आशिया चषकाच्या मागील 15 हंगामात दोन्ही संघ T20 आणि एकदिवसीय फॉरमॅटसह एकूण 16 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

या 16 सामन्यांपैकी एका सामन्याचा (वर्ष 1997) निकाल लागला नाही. उर्वरित 15 सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.

1984 ते 2018 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये एकूण 13 सामने खेळवण्यात आले, ज्यामध्ये भारताने सात वेळा पाकिस्तानला पराभूत केलं. त्याचवेळी पाकिस्तानने पाच वेळा विजयाची नोंद केली, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतीय संघाने 1984, 1988, 2008, 2010, 2012 आणि 2018 मध्ये दोन वेळा पाकिस्तानला पराभूत केलं.

तर दुसरीकडे, 1995 साली शारजाच्या मैदानावर झालेल्या आशिया चषकात भारताविरुद्धचा पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता. यानंतर 2000, 2004, 2008 आणि 2014 मध्येही पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता.

आशिया चषकात T20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान फक्त तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला तर एका सामन्यात पाकिस्तानने विजयाची नोंद केली.

2016 मध्ये भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता. तर 2022 मध्ये भारताने ग्रुप स्टेजमध्ये तर सुपर-4 मध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. त्यामुळे ही आकडेवारी पाहता आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यातील उत्कंठा शिगेला पोहोचणार हे स्पष्ट आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताचे संभाव्य प्लेईंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे प्लेईंग-11 : बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हरिस रौफ , नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.

भारत आणि पाकिस्तानचा लाइव्ह सामना पहा या ठिकाणी

आशिया कप 2023 मधील भारतविरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईल ऍप हॉटस्टारवर पाहता येईल, तर सामन्याचे थेट टीव्ही प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. जर चाहत्यांनी आशिया कप मोबाईल ऍप हॉटस्टारवर पाहिला तर त्यांना त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु जर हा सामना लॅपटॉप किंवा टीव्हीच्या ऍपवर पाहायचा असेल तर त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत पाकिस्तान

संबंधित बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

मंगळवेढ्यात ‘सोन्या’चा नवा खेळ! बँकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय?; बँकांचे धाबे दणाणले; बँका, पतसंस्थांनी सावध राहणे गरजेचे

March 15, 2026
सांगोल्यात धमकी देत मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 14, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 7, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
Next Post
धाकधूक वाढली! मंगळवेढ्यात घरासमोर हँडल लॉक करुन लावलेल्या दोन मोटर सायकली अज्ञात चोरट्याने पळविल्या

धाकधूक वाढली! मंगळवेढ्यात घरासमोर हँडल लॉक करुन लावलेल्या दोन मोटर सायकली अज्ञात चोरट्याने पळविल्या

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेच्या दिवशीच राडा! शेताच्या जुन्या वादातून सासू-सुनेला काठीने केली बेदम मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 22, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लव्ह मॅरेजची चर्चा! बेपत्ता तरुणीचा शोध लागला; प्रियकराशी विवाह करून थेट मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर, वडिलांच्या जागी पतीला दिले प्राधान्य

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा