mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! पत्नी सोडचिठ्ठी देत नसल्याच्या रागातून मामाचा खून; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 11, 2023
in क्राईम, सोलापूर
विकृती! तीन महिलांच्या खुनामागे शेती व पूर्व वैमनस्याचे प्राथमिक तपासात कबुली

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

मामाच्या सांगण्यावरूनच पत्नी सोडचिठ्ठी देत नसल्याचा संशय असल्याने आणि मागील भांडणाचा राग मनात ठेवून पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील देविदास नाईकनवरे यांचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

याबाबत करकंब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील देविदास नाईकनवरे यांची भाची प्रियंका हिचे ७ वर्षांपूर्वी गावातीलच सिद्धेश्वर नाईकनवरे यांच्यासोबत लग्न झाले होते.

मात्र प्रियंकाला शेतातील काम जमत नसल्यामुळे तिला सासरी पती आणि सासू-सासरे हे जाच करत होते, तसेच सोडचिठ्ठी देण्यासाठी दबाव आणत होते. प्रसंगी मारहाणही करत होते.

असेच एकदा सासरी प्रियंकाला मारहाण झाल्याचे समजताच मामा देविदास नाईकनवरे हे आपला चुलत भाऊ सचिन नाईकनवरेसह प्रियंकाच्या सासरी जाऊन प्रियंकाला मारहाण का केली? याचा जाब विचारला होता. त्यावेळी सासरा ब्रह्मदेव नाईकनवरे आणि पती सिद्धेश्वर नाईकनवरे यांच्यासोबत त्यांची बाचाबाची होऊन मारहाणही झाली होती.

या घटनेचा राग मनात ठेवून ब्रह्मदेव नाईकनवरे याने एखाद्या दिवशी देविदासला मुंगीसारखा चिरडून टाकीन, अशी धमकीही दिली होती. गुरुवारी सकाळी दहा वाजता पटवर्धन कुरोली – आव्हे रस्त्यावर देविदास नाईकनवरे नाईकनवरे हे

आपल्या फॅशन मोटारसायकल (क्र. एमएच १३ / सीके ९६४१) वरून गावातून शेतातील घराकडे जात असताना ब्रह्मदेव नाईकनवरे याने त्यांच्या बोलेरो गाडी (क्र. एमएच १३ / डीएन ८९८४ ) ने जोरात येऊन

देविदासच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन त्यास खाली पाडले तसेच शंभर ते दीडशे फूट फरपटत नेले. ही घटना घडत असताना प्रत्यक्षदर्शी राहुल नाईकनवरे यांनी ब्रह्मदेव नाईकनवरे यास अटकाव करण्याचा प्रयत्न केला.

मात्र ब्रह्मदेव नाईकनवरे यांनी गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा एकदा देविदास नाईकनवरे यांच्या अंगावर घातली. यात जबर जखमी झालेल्या देविदास नाईकनवरे यांना पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

याबाबत ब्रह्मदेव नाईकनवरे आणि सिध्देश्वर नाईकनवरे यांच्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: खूनपंढरपूर

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​ग्रामस्थांनो, हेलपाटे मारायचे बंद! आता थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO च्या व्हॉट्स ॲपवर पाठवा अर्ज; तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन नंबर केला जारी

May 26, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राष्ट्रीय कर्तव्य बजावताना आदर्श शिक्षकाचा उन्हाच्या तडाख्याने दुर्दैवी मृत्यू; शिक्षण क्षेत्र हादरले

May 26, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
Next Post
सिध्दनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्ताने खुपसंगीत आज मराठी-हिंदी गाण्यांचा ट्रॅक शॉ; विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

सिध्दनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्ताने खुपसंगीत आज मराठी-हिंदी गाण्यांचा ट्रॅक शॉ; विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..