मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
माजी आमदार कै. डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नॅब नेत्र रुग्णालय मिरज व डॉ. भाई गणपतरावजी देशमुख शेतकरी सहकारी सुत गिरणी सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक धनश्री व सिताराम परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
सदर हे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पावले क्लिनिक, शिवमंगल कॉम्प्लेक्स, बँक ऑफ इंडियाखाली, पोलीस स्टेशनसमोर,पंढरपूर रोड, मंगळवेढा येथे गुरूवार दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत पार पडणार आहे.
सदरचे शिबीराचे उद्घाटन संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांच्या हस्ते तर धनश्री व सिताराम परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
याप्रसंगी डॉ. शिवाजीराव पवार, जकराया शुगरचे चेअरमन अॅड. बी. बी. जाधव, डॉ.भीमाशंकर बिराजदार, डॉ.शरद शिर्के, विजय खवतोडे, युन्नूस शेख,यादाप्पा माळी, संजय कट्टे, दिगंबर भगरे, समाधान फुगारे,
अजित जगताप, विक्रांत पंडित, युवराज गडदे आदीजन उपस्थित राहणार आहेत. तरी या शिबीराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक धनश्री व सिताराम परिवाराने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज